बाप्पा सोबत सेल्फी निपाणी (वार्ता) : शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना गुरूवारी (ता. १) सायंकाळी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…. घोषणा देत भाविकांनी गणपती बाप्पाचा निरोप घेतला. बुधवारी( ता. ३१) पासून गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणरायाच्या …
Read More »हंचिनाळ -कोगनोळी रस्त्याची प्रचंड दुरावस्था
वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थातून तीव्र नाराजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याची मागील कित्येक महिन्यापासून प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवासी वर्ग अक्षरशः मेटामेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सदर रस्त्याची त्वरित …
Read More »निर्णय बदलण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक!
काँग्रेस कार्यालयासमोर गर्दी : बुधवारी मराठा मंडळमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापासून वर निपाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी येथील काँग्रेस कार्यालयासमोर गर्दी करून …
Read More »कर्नाटक राज्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, 27 जिल्ह्यांना फटका
बेंगळुरू : गेल्या काही दिवसापासून कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळं झाडं देखील उन्मळून पडली आहेत. …
Read More »हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला कॉलेजमध्ये बेदम मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल
बेंगलोर : सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच कॉलेजमधील इतर तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. …
Read More »नागरिकांना मुलभूत सुविधा द्या
तहसिलदार कारंडे : बोरगाव नगरपंचायतीला भेट निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोरगाव येथील मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन स्वच्छता, शुद्ध पाणी व आरोग्याबाबत जनजागृती करावी. नागरिकांच्या तक्रारी असल्यास तातडीने सोडविण्यास सहकार्य करा, अशा सुचना निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केल्या. बोरगाव शहराला भेट देऊन त्यांनी वरील सूचना केल्या. …
Read More »पूरामुळे राज्याचे ७,६४७ कोटीचे नुकसान; १०१२.५ कोटीची केंद्राकडे मागणी
बंगळूर : कर्नाटक सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ७,६४७.१३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड मार्गदर्शक तत्त्वांनुसार नुकसान भरपाई म्हणून १०१२.५ कोटी रुपये देण्याची आणि पुरामुळे राज्याला झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक नियुक्त करण्याची सरकारने केंद्राकडे मागणी …
Read More »हुक्केरीच्या आखाड्यासाठी मातब्बरांच्या नावाची चर्चा…
संकेश्वर (महंमद मोमीन) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक सात-आठ महिन्यांत होत असल्याने आतापासूनच अनेक मातब्बर नेते तयारीला लागलेले दिसताहेत. हुक्केरी विधानसभा निवडणुकीत मंत्री उमेश कत्तीं विरोधात काॅंग्रेसचे माजी मंत्री ए. बी. पाटील लढत देणार असल्याची चर्चा सुरु असताना आता यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव देखील …
Read More »शिवनंदा संघाने कला संस्कृती जपली : गुरुदेव हुलेपण्णावरमठ
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघाने ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक गुरुदेव हुलेपण्णावरमठ यांनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभा मंडप येथे आयोजित कर्नाटक सांस्कृतिक महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघातर्फे महोत्सवाचे …
Read More »निपाणी विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे सहा नावे पक्षश्रेष्ठीकडे
काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची माहिती : पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम निपाणी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निपाणी मतदारसंघातून सहा उमेदवारांची यादी काँग्रेसतर्फे पक्षश्रेष्ठींना माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याशी दोन वेळा चर्चा करून पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta