संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची लवकरच अन्यत्र बदली होणार असल्याची चर्चा नगरसेवकांतून केली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून ईटी संकेश्वर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावित आहेत. पालिकेत मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभर त्यांची कामगिरी चांगली ठरली. तदनंतर त्यांचा मनमानी कारभार सुरू झाला तो अद्याप चालूच …
Read More »बेंगलोर ते काशी रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार
बेळगाव : कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जात असतात त्यामुळे भक्तांना सोयीस्कर व्हावे याकरिता बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा सुरू होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. कर्नाटकातून निघणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारकडून पाच …
Read More »खानापूरात सकल योजनाची वर्षपूर्ती फेरी
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी योजनेच्या सकल योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खानापूर तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि. २० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून सकल योजनेची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांच्याहस्ते सकल योजनेच्या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयापासून फेरीची सुरूवात झाली. शिवस्मारकातून बाजार …
Read More »चौथ्या लाटेची भीती; सरकारकडून खबरदारी : आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर
बेंगळुर : दिल्ली आणि इतर राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बुधवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, दिल्लीसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »खानापूर शहराजवळील महामार्गाची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. …
Read More »सर्वोत्तम मधाळेंची ’सर्वोत्तम’ पेन्सिल आर्ट!
आतापर्यंत रेखाटलेली 60 चित्रे : 5 वर्षापासून जोपासलेला छंद निपाणी (विनायक पाटील) : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. त्यातूनच आपली कला सर्वासमोर आणण्यासाठी धडपडत असतात. त्यातून काहीजण अर्थार्जन करून आपला उदरनिर्वाह करतात. पण आडी येथील निवृत्त मुख्याध्यापक सर्वोत्तम मधाळे यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न …
Read More »मनीषा सुनील शेवाळे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील रहिवासी मनीषा सुनील शेवाळे यांना 25 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. सामाजिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित ’भीमपर्व’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री …
Read More »कबनाळी गावासाठी निवेदनाव्दारे बसची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कबनाळी गावाला खानापूर-कबनाळी अशी बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन तालुका विकास आघाडीतर्फे बस आगार व्यवस्थापक महेश यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खानापुर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व इतर निवेदनात म्हटले आहे की, खानापूर ते निलावडे मार्गे कबनाळी गावासाठी बस सुविधा व्हावी. कारण …
Read More »द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान हिजाबवरील बंदी कायम; प्रत्येकाने गणवेश परिधान करणे अनिवार्य
शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांचा महत्वपूर्ण आदेश बेंगळुरू : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली असून २२ एप्रिल ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठीदेखील हिजाबवर बंदी कायम ठेवण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्याने गणवेश परिधान करून परीक्षेला हजर राहणे अनिवार्य आहे, असा महत्वपूर्ण आदेश कर्नाटकचे शिक्षण मंत्री …
Read More »मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत लवकरच निर्णय
मुख्यमंत्री बोम्मई, नड्डांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा बंगळूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नवी दिल्लीत कर्नाटकासंदर्भात विशेष बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार किंवा फेरबदलाचा निर्णय घेण्यासाठी मला राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे बोलावले जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले. नड्डा यांनी रविवारी विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट …
Read More »