खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर हेस्कॉमच्या कार्यालयात नुकताच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यकारी अभियंता रंगनाथ सी. एस. होते. मेळाव्यात तक्रार मांडताना मोदेकोप गावचे शेतकरी श्रीकांत बाळापा कांबळे म्हणाले की, सर्व्हे नंबर 122/16 मधील शेतात एक वर्ष झाले. टी सी बंद आहे. त्यामुळे वीजपुरवठा होत नाही. …
Read More »शरद केशकामत फौंडेशन, केएलई, रोटरी क्लब बेळगांव आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात 300 जणांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या मठ गल्लीतील कवळेमठ हॉलमध्ये रविवारी दि. 17 रोजी शरद फौंडेशन, केएलई डिपार्टमेंट ऑफ ओर्थोपडीक, फिजीओथेरपी व रोटरी कल्ब बेळगांव यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात जवळपास 300 रूग्णांचा सहभाग होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. फौंडेशनचे संस्थापक शरद केशकामत, पिंटू …
Read More »अलीकडच्या काळात चळवळींची धार बोथट : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
‘जीवनरंग’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : ‘जेव्हा गातो मी भिमाचे गाणे, तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात डॉ. अच्युत माने’!, ‘करू नका माझ्या भिमाचा स्वप्नभंग’ डॉ. अच्युत माने यांच्या जीवनाचे आहेत अनेक ‘रंग’, या काव्यपंक्ती ने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून निपाणी करांच्या टाळ्या मिळवल्या. येथील …
Read More »गोंदिकुपीतील शर्यतीत रणजीत पाटील यांची बैलगाडी प्रथम
हनुमान जयंतीनिमित्त आयोजन : दिवसभर विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : गोंदिकुपी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये रणजीत पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार एक रुपये आणि निशान पटकाविले. त्या शर्यतीत नितीन पाटील आणि रोहित पाटील यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ३ हजार रुपये व …
Read More »वीज कोसळून खानापूर तालुक्यातील बेटगिरी येथील महिला ठार…
खानापूर : बेटगिरी येथील सौ. मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. आज शनिवारी वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. यावेळी मनिषा काजू वेचत होत्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना गंभीर अवस्थेत बेळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; परंतू तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या …
Read More »संतोष आत्महत्या प्रकरण; सात पथके कर्नाटकाच्या विविध भागात
एडीजीपी प्रताप रेड्डी; पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न बंगळूर : अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) (कायदा व सुव्यवस्था) प्रताप रेड्डी शनिवारी उडुपी येथे आले. त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कथित आत्महत्या प्रकरणी तीन तास बैठक घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत तपास पथकांचा भाग असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सकाळी …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेवर झाड कोसळून इमारतीचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारी दि. १६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने शाळेच्या प्रार्थना हाॅलचे संपूर्ण छप्पर मोडून जमिनदोस्त झाले. सुदैवाने शाळाना उन्हाळी सुट्टी असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कौलारू इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळावरून मिळालेली …
Read More »संकेश्वरात इच्छापूर्ती श्री मारुती मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड, यशागोळ काॅलनीतील इच्छापूर्ती श्री मारुती मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा पवनपुत्राच्या जयंतीला भक्तीमय वातावरणात पार पाडण्यात आला. संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रशेखर यशागोळ यांचे हस्ते नूतन श्री मारुती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पुरोहित …
Read More »संकेश्वरात श्री हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात पवनपूत्राच्या प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विनायक भागवत यांनी श्री मारुती प्रतिमेचै पूजन केले. भक्तगणांना प्रसाद स्वरुपात सुंठवडा …
Read More »एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी
धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …
Read More »