Sunday , December 14 2025
Breaking News

देश/विदेश

मेस्सीच्या “त्या” कृत्यामुळे चाहते संतापले; खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या….

  कोलकाता : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला. चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले आणि काहींनी स्टेडियमच्या खुर्च्याही तोडल्या. खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते. लोक त्याला …

Read More »

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

  लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी …

Read More »

गोव्यातील एका नाईट क्लबला भीषण आग, २३ जणांचा मृत्यू

  पणजी : गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि २० पुरुषांसह तेवीस जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे. मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते. जखमींना रुग्णालयात …

Read More »

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन

  मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते …

Read More »

१० व्यांदा घेतली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ!

  पटना : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहारमध्ये एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या गांधी …

Read More »

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये वडील, एका डॉक्टर आणि एक परिचारिका यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बाळाला अरवलीहून अहमदाबादला नेत असताना हा भीषण अपघात घडला. मोडासातील राणा सय्यदजवळ रूग्णवाहिकेला आग लागली. या आगीत चोघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर …

Read More »

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

  मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत दोषी; न्यायालयाचा मोठा निर्णय ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी मोठा निर्णय दिला आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांत शेख हसीना यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून थेट मृत्युदंडाची (फाशीची शिक्षा) शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. …

Read More »

मोलेम तपासणी नाक्यावर गोमांसाने भरलेली झायलो कार जप्त

  मोलम (गोवा) : मोलम (गोवा) तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास गोव्याकडे बेकायदेशीररित्या गोमांस वाहतूक करणारी टाटा कंपनीची झायलो कार पकडण्यात आली. या वाहनातून शेकडो किलो गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा संशयित पळून गेला असून जंगलात …

Read More »

नितीशकुमारांवर भाजपची सावध भूमिका, बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स

  पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावरून राजकीय वातावरण तापले आहे. जदयूने मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे, पण भाजपने मात्र याबाबत सावध भूमिका घेतल्याने सस्पेन्स कायम आहे. भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे की, ‘एनडीएचे आमदारच मुख्यमंत्री कोण हे ठरवतील.’ या वक्तव्यामुळे …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये स्फोट ९ जणांचा मृत्यू

  जम्मू : दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर …

Read More »