उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेची माहिती समजताच एसडीआरएफ, स्थानिक …
Read More »भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेत चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू
ओडिसा : ओडिसामध्ये सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेदरम्यान रविवारी आज श्रीगुंडिचा मंदिरासमोर पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेत तीन भक्तांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर १० ते १२ भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जणांची …
Read More »शुभांशू शुक्ला यांचे ‘मिशन स्पेस’; आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये एन्ट्री, 14 दिवस राहणार एस्ट्रोनॉट्स
नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकात एन्ट्री केल्यामुळे भारताचे स्वप्न पूर्ण झाले. शुभांशू शुक्लामुळे पहिला भारतीय अंतराळ स्थानकात पोहोचला आहे. आता शुभांशूसह तीन अंतरावीर पुढील 14 दिवस तिथे राहणार आहेत. शुभांशू शुक्ला अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत, स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नियोजित वेळेपेक्षा 20 …
Read More »शाळेत विस्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 मुलांचा मृत्यू
मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका शाळेत गुरुवारी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झाला. तर २६० जण जखमी झाले. बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा केला जात असताना हा स्फोट झाला. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, …
Read More »यंदापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना एका वर्षांत मिळतील. फेब्रुवारीत होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. फेब्रुवारीतील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि गुण सुधारायचे असतील अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे. …
Read More »इराण- इस्त्रायलमधील युद्ध थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. 12 दिवसांनंतर दोन्ही देश युद्ध थांबवण्यास तयार झाले आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर म्हटले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्त्रायल संघर्ष तीव्र होण्याची शक्यता होती. 13 जून रोजी …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, इस्त्रायलसोबत शस्त्रसंधीबाबत दिले स्पष्ट उत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबत एकमत झाल्याचा दावा केला आहे. परंतु इराणकडून त्यांचा हा दावा फेटाळण्यात आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याचा दावा फेटाळला. सध्या असा कोणताही करार झालेला नाही, असे अराघची यांनी म्हटले आहे. भारत पाकिस्तान दरम्यान …
Read More »तब्बल १२ वर्षांनंतर आसाराम बापूला जामीन मंजूर…
जोधपूर : २०१३ च्या बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २०१३ मध्ये आसारामला त्याच्या जोधपूर आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. जोधपूरच्या ट्रायल कोर्टाने ८६ वर्षीय आसाराम बापूला आयपीसीच्या कलम ३७६, पोक्सो कायदा आणि बाल न्याय …
Read More »अखेर इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री, इराणच्या 3 अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले
इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी …
Read More »नदीवरील पुलाचे कठडे तोडून कार थेट नदीत कोसळली; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
बक्सर : बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीवर अपघाताची भयंकर घटना घडली. नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव वेगात आलेली स्कार्पियो कार थेट नदीमध्ये कोसळली. कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री वीर कुंवर सिंह पुलावर ही अपघाताची घटना घडली. गंगा नदीवर रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta