Friday , May 1 2026
Breaking News

देश/विदेश

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

  नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीतीही लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मात्र इंधनाच्या किमती स्थिर राहिल्याने तेल कंपन्यांचे नुकसान वाढत आहे. हे नुकसान भरून …

Read More »

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बस पलटून 17 ठार

  जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर कघोट परिसरात एक बस पलटी झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी होऊन या अपघातात एकूण 17 प्रवासी ठार झाले तर 31 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही …

Read More »

टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला, नऊ जणांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

  चेन्नई : तामिळनाडूच्या वलपराई येथे झालेल्या एका रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. एका हेअरपिन वळणावर टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने तो घसरून दरीत कोसळला, तेव्हा हा अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, हे वाहन केरळमधील पेरिंथलमन्ना येथील 13 पर्यटकांना घेऊन वलपराईहून परत येत होते. 13 …

Read More »

कर्नाटकातील खासदारांची संख्या 28 वरुन 42 वर; अमित शहा यांची लोकसभेत माहिती

  नवी दिल्ली : आजपासून (१६ एप्रिल) संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून महिला आरक्षणाच्या दुरूस्तीसह मतदारसंघाची पुर्नरचना, घटनादुरूस्ती आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित विधेयक मांडण्यात आली आहेत.परंतु, मतदारसंघाची पुर्नरचना या विधेयकाच्या माध्यमातून दक्षिण, वायव्य आणि ईशान्येकडील राज्यांवर लोकसभांच्या जागांबाबतीत अन्याय केला जाईल, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. याला …

Read More »

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : श्री आदिचुंचनगिरी मठाने मांडलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या नऊ तत्त्वांचे पालन केल्यास ‘विकसित भारत’चा मार्ग अधिक सोपा आणि व्यवहार्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नागमंगल तालुक्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करताना त्यांनी …

Read More »

२५ भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत उलटली; १० ठार

  मथुरा : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. केसी घाटावर भाविकांना घेऊन जाणारी एक बोट तरंगत्या पुलाला धडकून यमुना नदीत उलटली. या बोटीत २० ते २५ भाविक होते अशी माहिती समोर आली असून, यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता …

Read More »

खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आसाममध्ये तक्रार; अटकेची मागणी

  बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्याविरोधात कथित वादग्रस्त व भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आसाममध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आसाममधील गुवाहाटी येथे राष्ट्रीय …

Read More »

श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू

  श्रीनगर : श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावर लडाखमधील झोजी ला या खिंडीजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून अनेक वाहने यामध्ये बर्फाखाली गाडली गेली आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हा …

Read More »

आंध्रप्रदेशात भीषण बस-टिप्पर अपघात; 14 जणांचा होरपळून मृत्यू, 18 जखमी

    अमरावती : आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील मार्कापुरमजवळ रायवरम परिसरात गुरुवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल बस आणि टिप्पर लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वेगात असलेल्या बसने गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्परला जोरदार धडक दिल्यानंतर बसला …

Read More »

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा तडफडून मृत्यू

    आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात दुधातील भेसळीच्या एका भीषण घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच लालचेरुवू, चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगरसारख्या …

Read More »