नवी दिल्ली : ज्ञानवापीसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी हाती आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आलाय. हे प्रकरण प्रथम जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश करणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरणी तीन …
Read More »लालू यादव यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या, सीबीआयकडून 17 ठिकाणी छापेमारी
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम 10 सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी …
Read More »नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! वृद्धाच्या हत्येप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धू यांच्या हल्ल्यात त्यावेळी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिद्धू यांना आता पंजाब पोलिसांकडून कधीही अटक …
Read More »ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्या, साध्वी कांचनगिरी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौर्यावर जाणार आहे. मात्र, भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी …
Read More »सिलेंडरची दरवाढ, सर्वसामान्य हैराण
नवी दिल्ली : देशभरात महागाईनं जोर धरला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, …
Read More »कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू
गुजरातमधील दुर्देवी घटना अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम …
Read More »गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; हार्दिक पटेलचा राजीनामा
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. यानंतर पटेल पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. …
Read More »मान्सून अंदमानात दाखल
पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकणार नवी दिल्ली : अंदमानच्या समुद्रात आज सोमवारी मान्सून दाखल झाला. केरळमध्ये तो 27 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. असे झाले तर यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा 5 दिवस अगोदरच दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले …
Read More »छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात; 2 पायलटांचा जागीच मृत्यू
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकॉप्टर पुन्हा लँड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला. रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, शहरातील माना क्षेत्रात …
Read More »आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार आहे. यूपीच्या शिक्षण मंडळाने हा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केला होता. सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत (जन गण मन) गाणे बंधनकारक …
Read More »