नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन करताना इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांच्या हितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करा, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. 27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी …
Read More »रथ ओढताना विजेचा धक्का; १० भाविकांचा मृत्यू, १५ जखमी
चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री …
Read More »जम्मूमध्ये भीषण चकमक; 4 दहशतवादी ठार, तर 1 जवान शहीद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या एक दिवस अगोदरच जम्मूमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. संबंधित अधिकार्यांनी सांगितले की, गोळीबारामध्ये एक सुरक्षा अधिकारी शहीद झाले आहेत. तर, 4 अधिकारी जखमी झालेली आहेत. तर या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मूमधील चढ्ढा कँप परिसरात शुक्रवारी सकाळी …
Read More »पंजाबमध्ये आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 मुलांसह सात सदस्यांचा मृत्यू
लुधियाना : मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बलदेव राज यांनी सांगितले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुरेश (54), …
Read More »महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने तर महाराष्ट्र, छत्तीसगड काँग्रेसने तर बिहारमध्ये आरजेडीने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची बाजी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल …
Read More »पंजाबमध्ये आप सरकारने करून दाखवलं! 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत
चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारकडून शनिवारी पंजाबमधील प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा नियम येथे 1 जुलै 2022 पासून लागू होईल. …
Read More »संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीकडून मोठा दणका बसला आहे. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केले आहेत. संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईची पुर्वकल्पना होती, असे विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. …
Read More »एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली …
Read More »श्रीलंकेतील परिस्थिती बिघडली; हिंसक आंदोलनानंतर कर्फ्यू लागू
कोलंबो : श्रीलंकेची अर्थव्यवस्था प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक संकट हाताळण्यात सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी …
Read More »भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा! : हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
हिंदू बांधवांनी भारतीय संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली, म्हणून हा केवळ हिंदू धर्मियांचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा आरंभ दिन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना …
Read More »