कोवाड : चंदगड एस टी आगारामध्ये आगार व्यवस्थापक, आगार प्रशासन व चालक वाहकामध्ये विविध कारणावरून धुसफुस चालू असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याने हा वाद नेमका मिटणार कसा? यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे.
चंदगड एस टी आगार गेल्या दोन वर्षापासून विविध प्रकारे चर्चेत आले आहे. आगार व्यवस्थापक विरोधात येथील चालक -वाहक व इतर कर्मचारी असा वाद रंगत चालला. आगार व्यवस्थापकानी थेट कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचारी संतापले आहेत. एका बाजूला चंदगड आगाराला मिळालेल्या नविन हिरकणी सारख्या गाड्या परत दुसऱ्या डेपोला जात आहेत. सध्या उपलब्ध गाड्या अनेक वेळा ब्रेकडाऊन होत आहेत. अशा गाड्या रस्त्यावरून धावताना प्रवाशांना तर धोका आहेच परंतु अशा काही गाड्यांना डिझेल जादा लागले तर त्याची चालकावर कारवाई केली जात आहे. वाहकाना तर उत्पन्न वाढीचे टारगेटच देण्यात आले आहे. टारगेट पेक्षा कमी उत्पन्न झाले तर वाहकाकडून ड्यूटी संपल्या नंतर पैशे डेपोत जमा करून घेण्यास नकार दिला जात आहे. सध्या पावसाळा चालू असल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यातच काही ड्यूट्या ह्या शालेय पासधारक विद्यार्थ्यांसाठी असल्याने अशा गाड्यांचे उत्पन्न कसे वाढणार? शेतीची कामे चालू आहेत प्रवाशी कमी आहेत. तरी पण उद्दिष्टसाठी कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. रा. प. महामंडळ व आरटीओ नियमानुसार ४४+११/४३+११ अशी क्षमता असताना सुध्दा चालक वाहक १२०/१४० प्रवासी नेतात. मग हे एवढे प्रवाशी न्यायचे की नाही?
यातच अचानक वस्तीच्या गाड्या रद्द करणे, वेळी अवेळी ड्यूट्या लावणे यामुळे कर्मचारी वैतगल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या वादात प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोना काळात बंद केलेल्या अनेक मार्गावरील बस अजूनही बंदच आहेत.
विभागीय स्तरावर कर्मचाऱ्यांच्या बाबत गैर समज निर्माण केले जात असल्याची व हेतूपुरस्पर कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी मेडिया समोर केली आहे. एकंदरीत चंदगड एस टी डेपोत आगार व्यवस्थापन व चालक वाहक यांच्यामध्ये धुसफूस मात्र निश्चितपणे चालू आहे. वरिष्ठानी याची तात्काळ दखल घ्यावी. पुणे विभागात स्वच्छ सुंदर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवलेल्या चंदगड एस टी डेपोतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांची मनेही स्वच्छ केल्यास उत्पन्न वाढीतली चंदगड अग्रक्रमी राहिल यामध्ये अजिबात शंका नाही.
कुठल्या नोकर्या आणि काय शाशन ऐवढ्या योजना देते आणि कोण सांगितलय फुकट राबायला राव.
😁🤪😁😁 बरोबर आहे ना माझं.
शाशन योजना चा लाभ मिळवण्यासाठी सर्व कागद पत्र बनवन्यासाठी बॅकांच्या उतरे झिरन्या वेळ पाहिजेत च ना.