Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

कन्नड विषयसक्ती; राज्य व केंद्र सरकारला नोटीस

  बंगळूर : राज्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय दुसरी किंवा तिसरी भाषा घेण्याबाबत सरकारने कायदा केला आहे. या कायद्याला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय लादल्याविरोधात दाखल याचिकेत नव्या कायद्यामुळे राज्यातील शालेय …

Read More »

15 ऑगस्टला देशात घातपाताचा कट महाराष्ट्र एटीएसने उधळला!

  मुंबई : महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळतेय. दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात आलीय. या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅब असल्याचंही उघड झालंय. या दहशवाद्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा …

Read More »

विडिंजची विजयी सुरुवात, भारताचा 4 धावांनी पराभव

  त्रिनिदाद : पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने चार धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेटच्या मोबल्यात 145 धावाच करता आल्या. भारताकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या टी 20 मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 ने आघाडी घेतली. …

Read More »

आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघातील पूरस्थिती व नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत उठवला आवाज!

  तेऊरवाडी : आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील पूरस्थिती व यासाठी कारणीभूत होणारा नदीतील गाळ काढण्यासाठी विधान सभेत आज आवाज उठवला. चंदगड विधानसभा मतदारसंघात तीन नद्या प्रवाहित आहेत. यामध्ये हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या तिन्ही नद्यांचे पाणी गेल्या वीस पंचवीस दिवसाच्या पावसामुळे चौथ्या ते आठव्या दिवशी नदीच्या पात्राच्या बाहेर येऊन …

Read More »

वाघराळीत वृद्ध दाम्पत्याचा खून की आत्महत्या?

  कारण अस्पष्ट, परिसरात उलटसुलट चर्चा तेऊरवाडी (एस के पाटील) : नेसरी पासून जवळ असणाऱ्या वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रीय रेल्वे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी सिधू तुकाराम सुतार (वय. ७०) त्यांची पत्नी बायाक्का सिधू सुतार (वय. ६५) या वृद्ध दाम्पत्याचे दोन स्वतंत्र खोलीत मृतदेह आढळून आल्याने नेसरी परिसरात खळबळ उडाली …

Read More »

निपाणीतील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक मनोहर बन्ने यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : मुळगाव अक्कोळ (सध्या रा.निपाणी) येथील साहित्यिक आणि पत्रकार मनोहर हालाप्पा बन्ने (वय ७२) यांचे गुरुवारी (ता.३) निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ५) निपाणी विभागातील मराठी वृत्तपत्रातील माजी मुख्य प्रतिनिधी म्हणून सुपरिचित असणारे मनोहर बन्ने हे प्रथितयश लेखक, कवी आणि चांगले समीक्षकही होते. अस्सल ग्रामीण बाज असणाऱ्या …

Read More »

ध्येय साध्य करण्यासाठी कणखर मानसिकता हवी

  एस. बी. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावे, असे वाटत असते. मात्र त्यासाठी ध्येय निश्‍चितीची नितांत आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्‍चितच काही कलागुण किंवा शक्तिस्थाने असतात. मात्र प्रत्येकाला त्याची जाणीव नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीआत्मपरीक्षण करावे. स्वतः ची शक्तिस्थाने ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर व्यवस्थापन समितीला निवेदन सादर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठा मंदिर येथील कार्यालयात पुन्हा कामकाज सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात मराठा मंदिर कार्यालय अध्यक्षांना एका निवेदनाद्वारे समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच कल्पना देण्यात आली. सदर निवेदन अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी मराठा मंदिर व्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रतीक्षाच!

  निवडणुका लांबल्याने इच्छुक अस्वस्थ; नगरपालिकेचा कारभारही प्रशासकाकडेच निपाणी (वार्ता) : मागील चार-पाच वर्षापासून वर्षापासून निपाणीतालुक्यासह जिल्ह्यातील तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकांची प्रतीक्षा सामान्य कार्यकर्त्यांना लागलेली आहे. या निवडणूका दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीआहे. त्यात राज्यातील सत्तांतर झाल्याने नेमके कोणाशी निष्ठावान रहावे, हा देखील प्रश्न कार्यकर्त्यांना पडत …

Read More »

समाजातील गरजा शोधून सेवा पुरवा

  माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतान; रोटरी, इनरव्हील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ निपाणी (वार्ता) : सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय पर्यावरण अशा विविध क्षेत्रात ११८ वर्षांपासून संपूर्ण जगात रोटरी ही एकमेव सामाजिक संस्था कार्यरत आहे आहे. युनोमध्ये मतदानाचा अधिकार असलेल्या रोटरी संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने सेवाभावी वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी …

Read More »