Monday , September 21 2026
Breaking News

स्पर्धा गोकाकात तर निवड चाचणी म्हैसूरात; शरीर सौष्ठव पट्टू संभ्रमात!

Spread the love

 

बेळगाव : 19 जानेवारी 2026 रोजी बारावी सतीश शुगर क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा जिल्हा आणि राज्य पातळीवर होणार आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, युवक जास्तीत जास्त प्रमाणात शरीर सौष्ठव स्पर्धेकडे वळावे यासाठी प्रोत्साहन म्हणून आयोजित केली आहे. सदर स्पर्धेमुळे बेळगाव जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात गाजले आहे. ही स्पर्धा गोकाक येथे होणार आहे मात्र बेळगाव जिल्हा मर्यादित होणाऱ्या या स्पर्धेची निवड चाचणी म्हैसूर येथे होणार आहे. या कारणाने बेळगाव येथील बरेचसे स्पर्धक संभ्रमावस्थेत आहेत. बेळगावपासून इतक्या लांब म्हैसूरला जाऊन निवड चाचणी देणे त्यासाठी होणारा खर्च हा स्पर्धकांना परवडणारा नाही. कारण बेळगाव भागातील गरीब, बहुजन कुटुंबातील मुले या स्पर्धेत स्पर्धक म्हणून उतरतात. म्हैसूरपर्यंतचा खर्च स्पर्धकांना न परवडणारा असल्याने बेळगाव जिल्ह्यातील स्पर्धाकांना जिल्हा पातळीवरील ही चाचणी बेळगावतच व्हावी आणि राज्य पातळीवरील चाचणी म्हैसूर येथे घेतली तरी चालेल, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील शरीर सौष्ठवपटूंनी केली आहे.

स्पर्धकांची मागणी लक्षात घेत बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले असून आयोजकांनी या स्पर्धेची चाचणी बेळगावतच घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री जारकीहोळी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान स्पर्धेचे आयोजक पालकमंत्री सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील तसेच राज्य पातळीवरील सर्व शरीर सौष्ठव स्पर्धकांना सतीश शुगर क्लासिक स्पर्धा खुली असून जास्तीतजास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *