Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास कागल तालुक्यातून जोरदार विरोध

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक बोलावणार कोल्हापूर : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या दुधगंगा नदीतून सुळकूड पाणी योजनेवरून राजकीय घमासान सुरु आहे. कागल तालुक्यातून राजकारण्यांसह शेतकऱ्यांमधून या योजनेला प्रचंड विरोध केला आहे. दुसरीकडे, इचलकरंजीमधील राजकारणी सुद्धा आता एकत्र झाले आहेत. त्यामुळे चांगलाच पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर …

Read More »

माजी आमदार अरविंद पाटील नंदगड सोसायटीत सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार : महादेव कोळी

  खानापूर : खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या नंदगड मुख्य कार्यालयाचा खत विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी आज खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना कोळी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील नंदगड तालुका मार्केटिंग सोसायटीत खत विक्रीत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आमच्या नेत्या …

Read More »

आर्थिक व्यवहारातून बाळेकुंद्रीत युवकाला मारहाण

  बेळगाव : आर्थिक व्यवहारातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावात घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शकील गुडुसाब बाळेकुंद्री, राहणार बाळेकुंद्री खुर्द या युवकाला पैसे वसुलीसाठी आलेल्या काही एजंटांनी पैसे न भरल्यावरून मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत शकीलने मारिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. …

Read More »

अंगणवाडी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

  बेळगाव : मतदार यादीत नावनोंदणी, नावे वगळणे आदी कामे करण्यासाठी दिलेल्या बूथ लेव्हल ऑफिसरच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अधिकाऱ्यांची धमकी, दादागिरी थांबवावी आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेसच्या (आयटक) नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. …

Read More »

अथक परिश्रमातून “ती” बनली सर्जन!

  डाॅ. स्नेहल मन्नुरकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा झेंडा अटकेपार फडकला……… बेळगाव : जीवनाच्या प्रत्येक वळणावर आज मुलींच्याच कर्तृत्वाचा बोलबाला आहे. एकवीसाव्या शतकाच्या संगणकीय क्षितिजावर ‘स्व’प्रतिभेने चमकणाऱ्या मुली आपल्या कर्तृत्वाची मोहर प्रत्येक उमटवताना अथक प्रयत्नांची मिसाल पेश करताहेत….. खरंतर घरी मुलगी जन्माला येणं म्हणजे आईवडीलांच्या संकटात वाढ होणं असंच काहीसं पण …

Read More »

‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी केले सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक

  नाथाजीराव हलगेकर स्मृतिदिनानिमित्त उपक्रम निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शैक्षणिक क्रांतीचेआद्य हितचिंतक, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व शिक्षण महर्षी नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून निपाणी नगरी स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या कामगार बंधू आणि भगिनींचे कौतुक करून आभार मानले. दरवर्षी नाथाजीराव हलगेकर …

Read More »

महापालिकेकडून दोन दिवसात 765 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

  बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज शहरातील व्यापारी दुकानांवर छापे टाकून सुमारे 765 किलो जप्त केले. बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या निर्देशानुसार शहरभर दि. 1 आणि आज दि. 2 रोजी तपासणी अधिकाऱ्यांनी 765 किग्रॅ. प्लास्टिक जप्त करून …

Read More »

खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य

  खानापूर : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे कुणा अधिकार्याचे लक्ष नाही की, लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात खड्डे पडल्याने बस वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यामुळे बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून …

Read More »

जन्म-मृत्यू नोंदणी काम वेळेत पुर्ण करा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : जन्म-मृत्यू नोंदणीचे काम मुदतीत पूर्ण करावे. नोंदणी प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय जन्म-मृत्यू समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जन्म-मृत्यू दाखले हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत आणि नोंदणीपूर्वी त्यांची माहिती नीट …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता

  महायुतीच्याआमदारांना मिळणार संधी मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. यंदा होणाऱ्याा मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी …

Read More »