Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील

  उपाध्यक्षपदी लक्कवा हुणसे; समविचारी मंचमधून निवड निपाणी (वार्ता) : गळतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या राजू उर्फ अलगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या लक्कवा हुणसे यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन समविचारी मंच स्थापन करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी करण्यात आल्या. तसेच अडीच वर्षाच्या काळात निम्मा काळ अध्यक्ष, उपाध्यक्षांची …

Read More »

लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्राम पंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी

  उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी निवड झाली. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाले त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी जी.डी. मंकाळे यांनी केली. यावेळी …

Read More »

कुर्ली-भाटनांगनूर वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

  कोगनोळी : कोकण पट्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे व कुर्ली परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पावसामुळे नदीकाठावरील पीके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. …

Read More »

राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडले, पाणी पातळीत मोठी वाढ

  बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत काल सोमवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सोमवारी दुपारी तीन वाजता जलाशयाचे दोन दरवाजे दोन इंचांनी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलाशय तुडुंब भरण्यास अजून दोन फूट पाणी गरजेचे आहे.

Read More »

पंचगंगेने धोका पातळी ओलांडण्याआधी नागरिकांनी स्थलांतर करावे : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

  • पूरबाधित क्षेत्रासह, संभाव्य पूरबाधित भागात साधला नागरिकांशी संवाद • जिल्हा प्रशासनाला निवाऱ्यासह, जनवारांची तातडीने सोय करण्याचे निर्देश • पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगेतील पाण्याचा विसर्ग ७० हजार क्युसेकवर जाणार कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90 टक्के, कासारी व कुंभी धरण 80 टक्के भरले आहे. सद्या पंचगंगेत 60 …

Read More »

खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना आज सुट्टी!

    बेळगाव : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी (25 जुलै) खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. खानापुरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि पीयू महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

जी. जी. चिटणीस स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदानाचे उद्घाटन

  बेळगांव : अनुदानाशिवाय संस्था चालविणे अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत जी. जी. चिटणीस शाळेने अत्यंत अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी केली याचा मला अभिमान वाटतो असे पालक मंत्री सतीश जारकीहोळी जी. जी. चिटणीस हायस्कूलच्या नूतन सुवर्ण महोत्सवी क्रीडा मैदान उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अणवेकर हे …

Read More »

स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!

  बेळगाव : सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसात स्मार्ट सिटीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. नव्याने केलेला अनगोळ- वडगाव मुख्य रस्ता अवघ्या दोन महिन्यात खचल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. काल रात्रीच या रस्त्यावरून जात असताना एक दुचाकीस्वार खचलेल्या रस्त्याचा अंदाज न …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाचे थैमान; घराची पडझड, लाखोचे नुकसान

  खानापूर : खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्यासह, तलावाना पूर आला आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने सर्वच पीके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील खेड्यात घरांना गळती लागुन घराच्या भिंती …

Read More »

गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी सौ. ललिता कोलकार, उपाध्यक्षपदी सौ. रेखा कुंभार यांची निवड

  खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३० महिन्याच्या कालावधीसाठी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी दि. २४ रोजी ग्राम पंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण एस सी महिला गटासाठी आले होते. तर उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सामान्य महिला गटासाठी आले …

Read More »