Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

अश्विनच्या फिरकीपुढे कॅरेबिअन आर्मी गारद, भारताचा एक डाव आणि 141 धावांनी विराट विजय

  यशस्वी जयस्वालची पदार्पणात शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात १२ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजा …

Read More »

दहशतवादविरोधी लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र, पॅरीसमधून पंतप्रधान मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल

  पॅरीस : दहशतवादाच्या विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते फ्रान्समध्ये बोलत होते. आपल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे असल्याचे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल …

Read More »

१३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदारला कांस्य

  बेळगाव : मालदिव येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदार या व्यायामपटुने कांस्यपदक मिळवून भारताचा तिरंगा फडकविला. दि. ५ ते ९ जुलैपर्यंत झालेल्या या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात व्यंकटेशने तिसरा क्रमांक मिळविला. बेळगावच्याच प्रविण कणबरकरने ७० किलो गटात चौथा क्रमांक पटकावला. प्रशिक्षक प्रसाद बसरीकट्टी …

Read More »

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

  पुणे : मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी …

Read More »

हुंचेनट्टीनजीक आढळला तरुणाचा मृतदेह

बेळगाव : बेळगाव शहरातील हुंचेनट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक आज शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून अरबाज मुल्ला (वय २५, रा. मच्छे , ता. बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, गुरुवारी रात्री अभियांत्रिकी …

Read More »

चांद्रयान-3 यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले!

  श्रीहरीकोटा : भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. …

Read More »

खानापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण!

  खानापूर :  खानापूर साठीही असाच एक अभिमानाचा क्षण आला आहे. कारण संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असणारी इस्रोची चांद्रयान -3 मोहीम आज शुक्रवारी दुपारी पार पडत असून या मोहिमेत खानापूरच्या प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचे योगदान आहे हे विशेष होय. देशाच्या इतिहासात आजचा शुक्रवार 14 जुलै हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला …

Read More »

खानापूर-बेळगाव सटल बस सुरू करा; खानापूर वकील संघटनेचा रस्ता रोको

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये-जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बससेवा सुरू करा. या मागणीसाठी खानापूर …

Read More »

खते-बियाणांत अडकले १० कोटी

  पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची पाठ; व्यापारी चिंतेत, आर्थिक व्यवहार ठप्प निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील दुकानदारांनी १० कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र वेळेवर पाऊस पडत नसल्याने व्यवहार ठप्प आहेत. याचा दुष्परिणाम आर्थिक उलाढालीवर होत आहे. एकीकडे पावसाच्या भरवशावर व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे पाऊस …

Read More »

लखनापुरात चोरी करणारा पेंटर १२ तासात जेरबंद

  चार तोळ्याचे दागिने जप्त; आरोपीची कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : घर रंगवण्यासाठी आलेल्या खुद्द पेंटरनेच घर मालकाच्या घरात असलेल्या तिजोरीतील सुमारे २ लाख रुपये किंमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केल्याची घटना नजीकच्या लखनापूर येथे गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान अवघ्या बारा तासात बसवेश्वर चौक पोलिसांनी संशयित पेंटरला …

Read More »