Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरचे मलप्रभा क्रीडांगण की गायरान? कधी होणार क्रीडागंणाचा कायापालट

  खानापूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सर्टीफायस्कूल जवळ उभारण्यात आलेल्या मलप्रभा क्रीडांगणाची दुरावस्था जशीच्या तशीच आहे. या मलप्रभा क्रीडांगणाचा कायापालट कधी होणार, अशी मागणी खानापूर शहरातील क्रीडा प्रेमीतून होताना दिसत आहे. माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात मलप्रभा क्रीडांगणाची उभारणी झाली. त्यांच्या काळात …

Read More »

शेतकऱ्यांच्या जमिनीची रक्कम मिळाल्याशिवाय गणेबैल टोलनाका चालु करू देणार नाही : प्रमोद कोचेरी यांची भुमिका

  खानापूर : बेळगाव -गोवा राष्ट्रीय महामार्गात शेत जमीन गेलेल्या प्रभूनगर, निट्टूर, गणेबैल, हलकर्णी, हत्तरगुंजी, करंबळ, होनकल, माणिकवाडी, सावरगाळी, माडीगुंजी, लोंढा गावातील भूसंपादन केलेल्या जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच (अतिरिक्त भूसंपादन) ॲडिशनल जमिनीचे पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळवण्यासाठी शेतकरी १० वर्षापासून प्रांताधिकार्‍यांच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारत आहेत. या शेतकऱ्यांकडे ना …

Read More »

हिंडलगा पी. के. पी. एस. संचालकांची अविरोध निवड

  चेअरमनपदी रमाकांत पावशे व व्हा. चेअरमनपदी जयश्री पावशे यांची निवड बेळगाव : हिंडलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक दि. 2 रोजी होणार होती. इच्छूक सभासदांनी अर्ज भरले होते. यामध्ये महिलावर्गात जयश्री र. पावशे, पार्वती वि. कोकितकर व भागाण्णा नरोटी, धर्मेंद्र रा. खातेदार, आण्णाप्पा सि. नाईक यांची …

Read More »

मुचंडीजवळ झालेल्या अपघातात 1 ठार

  बेळगाव : भरधाव मालवाहू वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी बेळगाव-गोकाक रोडवरील मुचंडीजवळ हा अपघात घडला. रमेश सोमनाथ कुंडेकर (वय 50, रा. मुचंडी) असे त्या मोटार सायकलस्वाराचे नाव आहे. मोटार सायकलवरून मुचंडीहून खणगावकडे जाताना मालवाहू वाहनाची पाठीमागून धडक बसली. या अपघातात गंभीर …

Read More »

मुनी महाराजांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड हिंदू जागृत संघटनेतर्फे बोरगावमध्ये मोर्चा

  निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आले. या हत्येचा जाहीर निषेध बोरगाव येथील अखंड हिंदू जागृत संघटनेतर्फे करण्यात आला. हत्येच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. रविवार पेठेतील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी मूक …

Read More »

उत्तर भारतात ‘जलप्रलय’…हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना तडाखा

  नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. सगळीकडे पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. संततधार पावसामुळे देशातील विविध भागांत आतापर्यंत जवळपास 20 जणांना जीव गमवावा लागला आहे. पावसाचा अंदाज घेता येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. …

Read More »

क्रेडाई महिला विभागाचा स्तुत्य उपक्रम; कामगारांना पाण्याच्या बाटल्यांची भेट

  बेळगाव : क्रेडाई या बांधकाम संघटनेच्या महिला विभागाच्या वतीने आठ जुलै रोजी बांधकाम कामगारांना पिण्याच्या पाण्याच्या स्टीलच्या बाटल्या भेट देण्यात आल्या. क्रेडाई सभासदांच्या सुरू असलेल्या विविध 18 कामांवर भेट देऊन त्यांनी 200 बाटल्यांचे वाटप केले. विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. श्री राधाकृष्ण डेव्हलपर्स यांच्या वतीने अनगोळ रोडवर सुरू …

Read More »

निरोगी जीवनासाठी आहार, व्यायाम महत्त्वाचा

  प्राणलिंग स्वामी : निपाणीत हृदयरोग तपासणी शिबिर निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात चमचमीत खाण्याच्या नादामध्ये आरोग्याचे नुकसान होत आहे. परिणामी सर्वच वयोगटांमध्ये हृदयरोग्यांची संख्या वाढत चालली आहे. हे टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि दररोज व्यायाम, योगासन आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करत नैसर्गिक जीवन पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. जीवन पद्धतीत …

Read More »

जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेतर्फे निषेध

  उद्या मुक मोर्चा : आरोपींना कठोर शिक्षेची मागणी निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. त्याचा निषेध दक्षिण भारत जैन सभेकडून करण्यात आला असून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सभेकडून करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष …

Read More »

स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी झपाटून अभ्यास करावा : निरंजन सरदेसाई यांचे प्रतिपादन

  खानापुरात मराठी प्रेरणा मंचच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार जांबोटी :  आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता ध्येय गाठण्यासाठी झपाटून अभ्यास करावा. सुरुवातीपासून विषय समजावून घेऊन आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती न वाटता परीक्षा एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी वाटेल, असे प्रतिपादन …

Read More »