Wednesday , April 22 2026
Breaking News

मुचंडीजवळ झालेल्या अपघातात 1 ठार

Spread the love

 

बेळगाव : भरधाव मालवाहू वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी बेळगाव-गोकाक रोडवरील मुचंडीजवळ हा अपघात घडला. रमेश सोमनाथ कुंडेकर (वय 50, रा. मुचंडी) असे त्या मोटार सायकलस्वाराचे नाव आहे. मोटार सायकलवरून मुचंडीहून खणगावकडे जाताना मालवाहू वाहनाची पाठीमागून धडक बसली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रमेश यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी मालवाहू वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक महांतेश बसापूर पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *