Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

  मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून अजितदादांनी राजीनामा सुपुर्द केला आहे. आजच मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत …

Read More »

अवैध वाळू उत्खननावर छापा; अथणी पोलिसांची धडक कारवाई

  अथणी : कृष्णा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी यांनी छापा टाकला. या छाप्यात 4 जेसीबी, 25 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केल्या. अवैध वाळूचा उपसा झाल्याने नद्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्याच बरोबर पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी या गोष्टी …

Read More »

यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार

  तब्बल १९ वर्षांनंतर असा योग; अधिक मासाचा परिणाम निपाणी (वार्ता) : यंदा मंगळवारपासून (ता.१८ जुलै) अधिक श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहेत. मात्र यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार यावर्षी …

Read More »

एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेतून वेस्ट इंडिज बाहेर

  हरारे : भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ खेळू शकणार नाही. कारण, दोनवेळची वर्ल्डकप चॅम्पियनवर बाहेर पात्रता फेरीतूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे. विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात विंडीजला स्कॉटलंडने सात गडी राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ कोणत्याही एकदिवसीय विश्वचषकाचा भाग …

Read More »

जून सरला, बळीराजा हदरला!

  जुलैमध्ये पेरणीची आशा; यंदाचा खरीप हंगाम धोक्यात निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यातील वळीव पाऊस झालेले नाहीत. शिवाय मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने जून महिना कोरडा गेला. त्यामुळे बळीराजा हदरला आहे. तर दुसरीकडे जुलै महिन्यात जोरदार पाऊस होईल, असे संकेत हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला तर …

Read More »

दुधगंगा नदीजवळ सापडल्या 4 कवट्या!

  कोल्हापूर : कोल्हापुरातील दूधगंगा नदीजवळ 4 कवट्या सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत आधिक माहिती अशी की, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी येत असतात. आज नियमाप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्‍याने …

Read More »

बेळगाव महापालिका स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. चारही स्थायी समिती भाजपने स्वतःकडे राखल्या आहेत. बेळगाव महापालिकेत अर्थ आणि कर, आरोग्य आणि सामाजिक न्याय, नगर नियोजन आणि बांधकाम यासह लेखा अशा चार स्थायी समित्या आहेत. महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यानंतर ही निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी …

Read More »

बोरंगाव मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शिवाजी भोरे

  निपाणी (वार्ता) : येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा समितीची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी भोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी अध्यक्ष रमेश वास्कर, उपाध्यक्ष अर्चना भादुले, मौला मुजावर, रेश्मा सौदागर, रफिक चोकावे, माधुरी नरशींगे, रामचंद्र पवार, जनार्धन कांबळे, रेश्मा माने, सीमा महाजन, पांडुरंग मुसळे, …

Read More »

यमगर्णीमध्ये गॅस स्फोट होऊन लाखाचे नुकसान; एक जण जखमी

  निपाणी (वार्ता) : स्वयंपाक गॅसचा अचानक स्फोट होऊन एक जण जखमी तर लाखाचे नुकसान झाल्याची घटना येथे शुक्रवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. युवराज देसाई असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी तब्बल सव्वा तास अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना …

Read More »

बेळगावात चार्टर्ड अकाउंटंट डे साजरा

  बेळगाव : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था 75 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. ICAI च्या दक्षिण विभागाच्या बेळगाव शाखेने ICAI भवन टिळकवाडी, बेळगाव येथील “शिवांगी मराठे सभागृह” येथे चार्टर्ड अकाउंटंट डे सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. विजयालक्ष्मी एल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि …

Read More »