Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

‘भारतात संघ पाठवला नाहीतर…!’ आयसीसीचा पाकिस्तानला सज्जड दम!

  नवी दिल्ली : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड रॉबिन स्टेज अंतर्गत सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. भारतीय संघाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी जेतेपदने हुलकावणी दिली …

Read More »

राज्यातला बळीराजा सुखी समाधानी व्हावा, मुख्यमंत्र्याचं विठुरायाला साकडं

  सोलापूर : आज आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी घातलं. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय …

Read More »

सेवानिवृत्ती निमित्त प्रा. नानासाहेब जामदार यांचा उद्या सत्कार

  निपाणी(वार्ता) येथील अर्जुननगर(ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नानासाहेब जामदार हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी (ता.३०) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रा. नानासाहेब जामदार यांनी आतापर्यंत कारवार, कणकवली, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. येथील …

Read More »

त्रिपुरात रथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

  त्रिपुरा : त्रिपुरात इस्कॉनकडून आयोजित भगवान जगन्नाथ यांच्या ‘उल्टा रथ यात्रा’ उत्सवा दरम्यान मोठी दुर्घटना घडली. हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने रथाला आग लागली. या या घटनेत दोन लहान बालकांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 लोक आगीत होरपळले आहेत. घटनेवर प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहेत. …

Read More »

निपाणीच्या डाॅ. ऋचा चिकोडे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील डी.एन.बी पदवीने सन्मानीत

  निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त शैक्षणिक संस्था आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड नवी दिल्ली यांनी 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर समकक्ष डीएनबी या पदवीसाठी नवी दिल्ली येथे परीक्षा घेतली होती. या परीक्षेत निपाणीची सुकन्या डाॅ. ऋचा मधुसूदन चिकोडे ही …

Read More »

उपतहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. मूळचे गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील, मण्णीकेरी यांनी महसूल विभागात विविध पदांवर काम केले आणि त्यांना उपतहसीलदार पदावर बढती मिळाली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्यांनी सहायक म्हणूनही त्यांनी …

Read More »

चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार; सहारनपूरमध्ये झाला प्राणघातक हल्ला

  लखनौ : भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी …

Read More »

पंढरी परब चौथ्यांदा अध्यक्षपदी, लेस्टर डिसोझा उपाध्यक्षपदी

  अमित पाटील यांची सचिवपदी तर खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची निवड बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून सलग चौथ्यांदा पंढरी परब यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष राम हदगल होते. बगीच्या हॉटेल्सच्या सभागृहात आयोजित …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची दडी; शेतकरी वर्गात चिंता

  खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होते. त्यामुळे नदी नाल्यांना पाणी मुबलक पाणी मिळते. मात्र यावर्षी कुठेच पाऊस न झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले …

Read More »

५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीत वाढ

  नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊसाचा रास्त व किफायतशीर दर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. २८ जून) घेतला. केंद्र सरकारने २०२३-२४ हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीत प्रति क्विंटल १० रुपये वाढ करुन ३१५ रुपये प्रतिक्विंटल केली आहे, अशी केंद्रीय …

Read More »