Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार

  मुंबई : भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथेच होणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकिस्तानची विनंती फेटाळत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. जय शाह यांनी आज मुंबईत घोषणा केली. वर्ल्ड कप फायनल आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 …

Read More »

देशातील अनेक राज्यांसाठी यलो, ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि पूराची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू, तर इतर १० जण जखमी …

Read More »

केसीआर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

  सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांनी आज सकाळी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश होणार आहे. यानिमित्त केसीआर हे आपल्या मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह सोमवारपासून दोन दिवसीय सोलापूर शहर- जिल्हा दौऱ्यावर आहेत. केसीआर …

Read More »

खानापूर तालुक्यातील ३५ रस्त्यांचे काम पूर्ण; माजी आमदार अंजली निंबाळकर

  खानापूर : मी आमदार म्हणून कार्यरत असताना विकास हाच दृष्टिकोन ठेवून सरकारदरबारी विकासकामांचा पाठपुरावा केला होता. यात तालुक्यातील ३५ ग्रामीण संपर्क रस्ते आणि चार पुलांच्या विकासाचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रामीण पंचायत राज विकास विभागाच्या अनुदानातून मंजूर झालेले हे रस्ते वापरासाठी सज्ज झाले असून जनतेला …

Read More »

रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय नशा विरोधक दिन संपन्न

  खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालय आणि पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि. २६ रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य निषेध दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम्. एच्. नाईक हे होत. यावेळी रामनगर पोलीस स्थानकाचे पीएसआय श्रीकृष्णकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना …

Read More »

कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार : सी. ए. शशिधर शेट्टी नवे अध्यक्ष

  बेळगाव (प्रतिनिधी) : मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ जून २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीनंतर कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (KASSIA) च्या नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. सन २०२३-२४ साठी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष म्हणून सी. ए. शशिधर शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. ए. शशिधर शेट्टी हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या …

Read More »

कंग्राळ गल्ली, गांधीनगरतर्फे पावसासाठी गाऱ्हाणे

  बेळगाव : प्रलंबित मान्सूनचे त्वरेने आगमन होऊन बेळगाव शहर आणि परिसरात मुबलक पाऊस पडून पाण्याची समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगर येथील पंचमंडळी व नागरिकांच्यावतीने ग्रामदैवत श्री धुपटेश्वर देवाला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आज सोमवारी भक्तीभावाने पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शोभा सोमनाचे …

Read More »

“पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला भारताला फार कष्ट पडणार नाहीत”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान!

  नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा पूर्ण काश्मीरप्रमाणेच चर्चेचा आणि वादाचा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पाकिस्ताननं काश्मीरचा हा भाग बळकावला. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा राहिला. भारतात आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतीय भूमीचा भाग करण्यात अपयश आलं असताना विरोधी …

Read More »

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची शेकडो गाड्यांसह सोलापुरात सिंघम स्टाईलने एन्ट्री

  अख्खं मंत्रिमंडळ उद्या घेणार विठ्ठलाचं दर्शन सोलापूर : तेलंगाणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर …

Read More »

15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही आक्षेप; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

  पुणे : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा …

Read More »