Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

नागपूर कारागृहात जीवाला धोका; मला बेळगाव कारागृहात पाठवा : जयेश उर्फ शाकीर पुजारी

  नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करुन १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारीला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, माझी या प्रकरणी नागपुरातील चौकशी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा बेळगाव कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका …

Read More »

आनंदनगर वडगाव भागात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  वडगाव : दुसरा क्रॉस आनंद नगर वडगाव या ठिकाणी नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड या ठिकाणी होत आहे, गेल्या आठ दिवसापासून आनंद नगर दुसरा क्रॉस येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात …

Read More »

‘बुडा’ कार्यक्षेत्राचा विस्तार होणार; २८ गावांच्या समावेशाबाबत फेरविचार?

  राज्यातील सत्तांतरामुळे नव्याने चर्चेची शक्यता बेळगाव : बेळगाव तालुक्यातील २८ गावांचा ‘बुडा’ कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने या प्रस्तावावर फेरविचार होणार असल्याची माहिती मिळाली. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना २०२० मध्ये ‘बुडा’ प्रशासनाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आधी २७ गावांचा बुडा …

Read More »

दैव बलवत्तर म्हणून नागाच्या दंशापासून बालिका बचावली

  हालगा येथील घटना; सर्पमित्राने पकडले बेळगाव : साप म्हटले की, भीती वाटल्यावाचून राहत नाही. सर्पाचा दंश हा जीवघेणा “असतो, हे प्रत्येकाच्या मनात ठसलेले असल्याने सापाबद्दल दया, ‘सहानुभूती वाटणे दुरापास्तच. साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे विज्ञानवाद्यांनी सिध्द करून दाखविले आहे. पण, रस्त्यावर, घरात किंवा …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना उद्या अभिवादन!

  बेळगाव : 1 जून 1986 साली कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात झालेल्या हुतात्मा अभिवादन करण्यासाठी उद्या गुरुवार दि. 1 जून रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे सीमाभागातील मराठी बांधव 1 जून रोजी या हुतात्मा अभिवादन गांभीर्याने पाळतात, यावर्षीही 1 जून रोजी या …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे आज 30 मे रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. यावेळी १ जून रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा असे आवाहन तालुका वासियांना करण्यात आले. १ जून रोजी …

Read More »

आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं ‘सोनं’ घेतलं ताब्यात

  हरिद्वार : २३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी आज मोठा निर्णय घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतल्याचे कळते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष …

Read More »

मुकादमांच्या भुलथापांना बळी पडू नका

कोगनोळी येथे ऊस वाहतूकदारांची बैठक : फसव्या मुकादमाबाबत सविस्तर चर्चा कोगनोळी : महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारे फसवे मुकादम कर्नाटक राज्यामध्ये आसरा घेऊन येथील ऊस वाहतूकदारांची फसवणूक करु नयेत. यासंदर्भात निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे ऊस वाहतूकदारांची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. वाहतूकदारांसह मान्यवर सदर …

Read More »

प्रा. शंकर जाधव यांना आरसीयुची डॉक्टरेट जाहीर

  बेळगाव : मूळचे इनाम बडस गावचे रहिवासी असलेले कवि, लेखक, पत्रकार प्रा. शंकर जाधव यांना बेळगावच्या राणी चेन्नम्मा विद्यापीठाची (आरसीयु) डॉक्टरेट अर्थात विद्यावाचस्पती पदवी जाहिर झाली आहे. “1960 नंतरच्या कोकणातील लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे व्यासंगी प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांचे …

Read More »

खुशखबर! अंदमानातून मान्सून पुढे सरकला; ‘आयएमडी’ ची माहिती

  पुणे : गेल्या आठवड्यात १९ मे रोजीच मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. परंतु ३० मे पर्यंत मान्सूनच्या स्थितीमध्ये कोणतीही प्रगती झाली नव्हती. परंतु गेल्या ११ दिवसांपासून अंदमानातच थांबल्यानंतर आता मात्र मान्सून नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने नुकतीच दिली आहे. हवामान …

Read More »