Sunday , July 26 2026
Breaking News

दैव बलवत्तर म्हणून नागाच्या दंशापासून बालिका बचावली

Spread the love

 

हालगा येथील घटना; सर्पमित्राने पकडले

बेळगाव : साप म्हटले की, भीती वाटल्यावाचून राहत नाही. सर्पाचा दंश हा जीवघेणा “असतो, हे प्रत्येकाच्या मनात ठसलेले असल्याने सापाबद्दल दया, ‘सहानुभूती वाटणे दुरापास्तच. साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे विज्ञानवाद्यांनी सिध्द करून दाखविले आहे. पण, रस्त्यावर, घरात किंवा अडगळीच्या खोलीत साप दिसून आला, की हातात काठी किंवा दगड घेऊन ठेचणे असे अनेकजण आजही करीत असतात. सूज्ञमंडळी सर्पमित्रांना पाचारण करतात, पण सापाबद्दल भीती ही आजही माणसाच्या मनातून कमी झालेली नाही, हेच सिध्द होते. एखादा विषारी सर्प दिसून आल्यास पाहणारा गर्भगळीत होतो. सर्पाच्या तावडीतून सुटका झाल्यास ते सुदैवच म्हणावे लागेल. असाच प्रकार हालगा येथे नुकताच घडला आहे.

हालगा येथील सैबन्नावर यांच्या घरी शेजारील ६ वर्षांची मुलगी आली होती. याचवेळी सैबन्नावर यांच्या घराच्या प्रवेशद्वार भिंतीच्या बाजूने नाग जात होता. मुलीचे लक्ष नव्हते. ती घरात प्रवेश करणार इतक्यात नागाचे तोंड तिला दिसले. तिने उडी मारून घरात प्रवेश केला. नागाला आपल्या बाजुने कोणीतरी येत आहे, याची जाणीव होताच तो सळसळत बाजुला होऊन निघून गेला. कदाचित मुलीचा पाय नागसर्पावर पडला असता तर तिच्या पायाला नागाचा विळखा बसला असता. सर्पदंश होऊन अनर्थही घडला असता. पण, मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती सुखरुप राहिली. सैबन्नावर कुटुंबियांनी सर्पमित्र रामा पाटील यांना बोलावून घेतले. श्री. पाटील यांनी नागाला पकडल्यानंतर मुलीचे पालक व सैबन्नावर कुटुंबीयांनी सुटकेचा दीर्घ निःश्वास सोडला.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love    बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *