Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

शहापुरात शिवरायांचा जयघोष!

  बेळगाव : शहापूर भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी साकारलेल्या सजीव देखाव्याने शहापूर भागात अवघी शिवसृष्टी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच, मिरवणूक पाहण्यासाठी नाथ पै चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रारंभी शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे नाथ पै चौक येथे चित्ररथ मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. …

Read More »

पंतप्रधान मोदींचा राजदंडाला दंडवत, नव्या संसदेत राजदंड स्थापित

  नवी दिल्ली : देशाला आज नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची …

Read More »

लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत

  नवी दिल्ली : राज्यातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे 2024 होणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, …

Read More »

आयपीएलचा कोण होणार चॅम्पियन? गुजरात की चेन्नई

  अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा महाअंतिम सामना आज (रविवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या सत्राचा चॅम्पियन बनण्यासाठी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचे नेतृत्व कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोनी करणार आहे, तर …

Read More »

बेळगावनगरीत अवतरली शिवसृष्टी!

    बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित केले. निवडणुकीमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे …

Read More »

सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या स्वागतासाठी बेळगाव सज्ज

  बेळगाव : राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचे नवे मंत्री म्हणून शपथ घेतलेले सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावात येणार आहेत. एकत्र येणार्‍या दोन्ही मंत्र्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले असून शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 20 मे रोजी सतीश जारकीहोळी आणि 27 मे रोजी लक्ष्मी …

Read More »

राजस्थानात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे थैमान; १३ जणांचा मृत्यू

  जयपूर : उत्तर भारत आणि पाकिस्तान-पंजाब सीमेवर तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम राजस्थानात दिसत आहे. राजस्थानात गेल्या चार दिवसांपासून वादळी वारे, गारपीठासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. फतेपूर शहरात ४ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४ दिवसांमध्‍ये शहरामध्ये १०६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.तर आज ( दि. …

Read More »

गवसेजवळ ११ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

  आजरा : गवसे (ता.आजरा) जवळ आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी आज (दि. २७) जप्त केली. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात …

Read More »

खाते वाटपाची यादी बनावट; काँग्रेसचे स्पष्टीकरण

  बेंगळुरू : काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. आता जी यादी फिरत आहे ती बनावट असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने आता याबाबत ट्विट केले आहे. सोशल मीडिया आणि काही मीडियावर अकाउंट शेअरिंगबद्दलची बनावट यादी व्हायरल झाली आहे. तसेच खाती शेअर करू नका, कोणाचेही अनुमान ऐकू …

Read More »

निपाणीतील झाडे अर्जुनी देवराईत!

  पर्यावरण प्रेमींनी रोखली वृक्षांची कतल: ५० झाडांचे केले पुनर्रोपण निपाणी (वार्ता) : येथील बेळगाव नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील ७५ पेक्षा जास्त झाडांची कतल करून लोखंडी विमान बसवण्याच्या प्रक्रियेचा विरोध केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवत प्रशासनाने झाडे तोडली. पण पर्यावरण प्रेमींनी ही झाडे जेसीबीच्या साह्याने मुळासकट उपटून …

Read More »