Monday , September 21 2026
Breaking News

गवसेजवळ ११ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

Spread the love

 

आजरा : गवसे (ता.आजरा) जवळ आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी आज (दि. २७) जप्त केली. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घवण्यात आले आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती आजरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आजरा पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून सापळा रचला होता.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *