Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्या : समिती नेते रामचंद्र मोदगेकर यांची निवेदनाद्वारे खा. धैर्यशील माने यांच्याकडे मागणी

  बेळगाव : मुंबई येथील मंत्रालयामध्ये सीमा कक्षाच्या सभागृहात तज्ञ समितीची विशेष बैठक 10 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीप्रसंगी सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निवेदन देत सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती केली. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र …

Read More »

‘मानस कराटे ॲकॅडमी’चे कोलकात्ता राष्ट्रीय स्पर्धेत यश

  बेळगाव : बेळगावच्या ‘मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे ‘जे.एस.एस.के.’ संस्थेतर्फे आयोजित ‘ओपन नॅशनल कराटे’ स्पर्धेत देशभरातील ६०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, नेपाळ, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ …

Read More »

देवस्थानाच्या मूळ ढाच्याला धक्का लागता कामा नये : सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

  कोल्हापूर (जिमाका) : येथील महालक्ष्मी तसेच जोतिबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे आधुनिकीकरण करत असताना देवस्थानच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची संबंधित एजन्सीने दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात देवस्थान (तिर्थक्षेत्र) विकास आराखड्याच्या …

Read More »

शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबद्ध : आमदार विठ्ठल हलगेकर

  खानापुरात सरकारी विद्यालयात इमारतीचे भूमिपूजन! खानापूर : खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी आमचा नेहमी प्रयत्न असणार आहे. मागील सरकारच्या काळात खानापूर तालुक्यातील दोन सरकारी विद्यालयाच्या विकासासाठी तत्कालीन शैक्षणिक मंत्री सुधाकर यांच्याकडे आम्ही अर्ज विनंती केली होती. त्यानंतर देखील विद्यमान सरकारकडे आपण या दोन महाविद्यालयांच्या इमारत विकासासाठी निधीचा प्रस्ताव केला होता …

Read More »

राष्ट्रचिन्हाचा अवमान करणाऱ्या कृत्यावर कठोर कारवाई करा

  विविध हिंदुत्ववादी संघटनांची मागणी; तहसीलदारांमार्फत वरिष्ठांना निवेदन निपाणी(वार्ता) : जम्मू आणि काश्मीर राज्यातील हजरतबल दर्यातील मुख्य प्रार्थनागृहाबाहेर असणाऱ्या फलकावरील भारताचे राष्ट्रचिन्ह ‘अशोक स्तंभ’ काही धर्मांध आणि देशविघातक घटकांनी तोडून टाकले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या गैरकृत्यामुळे भारतीय अस्मिता, संविधान आणि सार्वभौमत्वावर केलेला थेट हल्ला आहे. …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय निवड

  बेळगाव : दि. 10/09/2025 रोजी जिल्हा क्रिडांगण नेहरू स्टेडियम येथे बेळगाव तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये कु. श्रेयश चांगळी ह्याने 80 मी अडथळा सपर्धेमध्ये प्रथम क्रमांक, कु. सिद्धी कुगजी हिने 3000 मी. धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व विनायक बिर्जे उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कुस्ती स्पर्धेत अक्षरा गुरव हिने 54 …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार!

  बेळगाव : शिवाजीनगर, बेंगळूर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी मेट्रो स्थानक असे करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. सदर निर्णयाला कर्नाटकातून तीव्र विरोध होत आहे. शिवाजीनगर स्थानकाचे नाव सेंट मेरी असे न करता छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून येत्या सोमवारी …

Read More »

उप्पीट खाल्ल्याने निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ : दोघांची प्रकृती गंभीर

  चिक्कोडी : नाश्त्यात उप्पीट खाल्ल्याने मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. बेळगावमध्ये चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत ही घटना घडली. सकाळी नाश्त्यात विद्यार्थ्यांना उप्पीट देण्यात आले. उप्पीट खाल्ल्यानंतर काही वेळातच ३० विद्यार्थी अत्यवस्थ झाले. अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

कित्तूरमधील डीसीसी बँकेच्या शाखेसमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; सचिवाच्या अपहरणाचा प्रयत्न…

  बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे निवडणूक मैदानाचे रणांगणात रूपांतरित होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली आणि कित्तूरमधील डीसीसी बँकेच्या शाखेसमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. काँग्रेस सदस्यांची संख्या कमी असल्याने निवडणूक ठराव …

Read More »

सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ! 

  नवी दिल्ली : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली. लाल कुर्ता घालून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. देशाचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. …

Read More »