Saturday , September 5 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय निवड

Spread the love

 

बेळगाव : दि. 10/09/2025 रोजी जिल्हा क्रिडांगण नेहरू स्टेडियम येथे बेळगाव तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये कु. श्रेयश चांगळी ह्याने 80 मी अडथळा सपर्धेमध्ये प्रथम क्रमांक, कु. सिद्धी कुगजी हिने 3000 मी. धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व विनायक बिर्जे उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कुस्ती स्पर्धेत अक्षरा गुरव हिने 54 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, प्रसाद कदम कुस्तामध्ये व्दितीय. अनुश्का चौगुले हिने कराटे स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले, एन वाय मजूकर, टी. यस. बोकडेकर, ए. बी. कांबळे, एल. एस. बांडगे, वाय. बी. कंग्राळकर, व्ही. पी. जीवाई तसेंच संस्थेचे, अध्यक्ष श्री. गुरुवर्य वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विध्यार्थी पालक व गावाकऱ्यांच्या अभिनंदनास पात्र ठरले व पुढील जिल्हा लेवल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

भक्तिमय वातावरणात श्रावण शुक्रवारची सांगता

Spread the love    गोकुळाष्टमीच्या उत्साहात वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन; घरोघरी देवीपूजनासह सुवासिनींनी भरल्या एकमेकींच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *