Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी ३९८ कोटी

  मंत्रिमंडळाचा निर्णय; रामदुर्ग, सौंदत्ती तालुका रुग्णालयांचे नूतनीकरण बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील २२ विधानसभा मतदारसंघांमधील अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी एकूण ३९८ कोटी रुपयांच्या अनुदानाला मान्यता दिली आहे. विजयपुर विमानतळाचे काम, आरोग्य क्षेत्राची सुधारणा आणि रस्ते संपर्क सुधारणेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग आणि सावदत्ती तालुका रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी …

Read More »

सी. टी. रवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

  मद्दूर गणेश विसर्जनात ‘प्रक्षोभक’ भाषण बंगळूर : मद्दूर येथील गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक विधाने केल्याच्या आरोपावरून भाजप नेते आणि आमदार सी. टी. रवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्दूर पोलीस उपनिरीक्षकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सी. टी. रवीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे कळते. तक्रारीच्या आधारे, वेगवेगळ्या समुदायांमध्ये द्वेष …

Read More »

बेळवट्टी येथे महालक्ष्मी सोसायटीची १९ वी सभा खेळीमेळीत

  बेळगाव : बेळवट्टी – बकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचा १९ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बी. बी. देसाई होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मनोहर सांबरेकर, मारुती कांबळे, अर्जुन पाटील, सातेरी चांदीलकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. …

Read More »

‘येळ्ळूर फलक’ खटला प्रकरण : ४२ जणांची निर्दोष मुक्तता!

  बेळगाव : सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेले येळ्ळूर गाव. येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य” फलक हटविल्याच्या पार्श्वभूमीवर गावात अशांतता निर्माण झाली होती. या प्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्या पैकी खटला क्रमांक 125 मधील 42 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याकडे बेळगावसह संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून राहिले होते. 2014 …

Read More »

जैन बोर्डिंगच्या श्रीनिकेतन शाळेतर्फे सहकाररत्न डॉ. कुरबेट्टी यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूलचे संस्थापक डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांना सहकार रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त शांतिनिकेतन हायस्कूलचे अध्यक्ष कपूरचंद इंगळे, डॉ. अनिल ससे, संचालक मिलिंद चौगुले, सेक्रेटरी प्रदीप पाटील आणि शिक्षकातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »

शासनाच्या सोयी, सुविधा मिळविण्यासाठी धार पवार बांधवांचा लवकरात निपाणीत मेळावा

  निपाणी (वार्ता) : धार, पवार बांधवांना एकत्र आणण्यासाठी निपाणी लवकरच बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागातील धार पवार समाजबांधवांची व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी संपर्क साधण्याचे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नागरिक गोविंद पवार निपाणी (रामपूरकर) यांनी केले आहे. पवार म्हणाले, समाजाचा इतिहास सीमा भागातील पवार बांधवांना समजणे आवश्यक आहे. याशिवाय …

Read More »

बेळगाव इलेव्हन संघ विभागीय हॉकी स्पर्धेत उपविजेता

  बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, गदग यांच्या सहकार्याने बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा गेम्स २०२५ (हॉकी) महात्मा गांधी हॉकी स्टेडियम, बेटगेरी-गदग येथे झालेल्या बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा क्रीडा स्पर्धेच्या हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. सदर हॉकी स्पर्धेत बेळगाव इलेव्हन संघाने डी वाय एस …

Read More »

कुळाच्या वादातून दीराने केला भावजयीचा डोक्यात फावडा घालून खून; जोयडा तालुक्यातील घटना

  रामनगर : कुळाच्या वादातून दीराने भावजयीच्या डोकीत फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील मालंबा गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी घडली. धोंडू गंगाराम वरक (वय 55) या इसमाने आपल्या भावजय भाग्यश्री सोनू वरक (वय 32) हिला घरासमोरच डोक्यात फावड्याने मारहाण करून ठार केले. घरातील कुळाच्या हक्कावरून …

Read More »

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

    कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता देत राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. कोल्हापूर शहरास …

Read More »

जांबोटी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराविरोधात मागासवर्गीय नागरिकांचा मोर्चा

  जांबोटी : जांबोटी येथील मागासवर्गीय कॉलनीतील नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढत पंचायतीतील भ्रष्टाचाराचा जाब विचारला. मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी मागासवर्गीय खात्यामार्फत आलेल्या विशेष निधीचा वापर न करता परस्पर पैसे लाटल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. गेल्या पाच वर्षांत मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी गटार बांधकाम, समुदाय भवन दुरुस्ती, सोलार दिवे, विजेची थकबाकी भरणे आदी …

Read More »