Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

चाकूने भोसकून केली महिलेने तरुणाची हत्या

बेळगाव : क्षुल्लक कारणावरून महिलेने चाकूने भोसकून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगावात घडली आहे. शहरातील जुन्या पीबी रोडवरील कीर्ती हॉटेलजवळ रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली असून नागराज भीमसी रागीपाटील (वय 28, रा. तारिहाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दारूच्या नशेत चाकू घेऊन जाणाऱ्या महिलेची विचारपूस केल्यावर …

Read More »

सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या माणसाला निवडून द्या

  राष्ट्रवादीचे युवानेते आमदार रोहित पवार यांचे उद्गार बेळगाव : येणारी निवडणूक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि निष्ठेची आहे. मराठी माणूस हा स्वाभिमान जपणारा आणि लढवय्या आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय निश्चित आहे. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी विधिमंडळात आपला लोकप्रतिनिधी लागतो. त्यासाठी सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या माणसाला निवडून द्या, असे उद्गार …

Read More »

सीमावासियांनी मतदानातून लोकेच्छा दाखवून द्यावी : रोहित पवार

बेळगाव : मराठी भाषा, महाराष्ट्र या एका विचाराने अनेक हुतात्म्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. अजूनही त्या हुतात्म्यांचे स्वप्न साकार झालेले नाही. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी माणसाने लढा दिला पाहिजे. आपला प्रतिनिधी विधिमंडळात पाठवायला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उचगाव आणि बेळवटी या ठिकाणी …

Read More »

निप्पाणी-चिकोडी रस्त्यावर कारच्या धडकेत पतीपत्नीचा मृत्यू

  चिक्कोडी : निप्पाणी-चिक्कोडी रस्त्यावर कोथळी क्रॉसजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. गोकाक तालुक्यातील मल्लापूर पीजी गावातील बसवराज श्रीमंत नंदगावी (वय ४८) आणि दोडव्वा बसवराज नंदगावी (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. कारमधील चार जण जखमी झाले. बसवराज हा दुचाकीस्वार पत्नी दोड्डव्वा सोबत कोथळी गावात नातेवाईकाच्या घरी जात …

Read More »

उपनगरीय भागातून अमर यळ्ळूरकर यांना भरघोस पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांची प्रचारामध्ये आघाडी दिसत आहे. शहरी भागातील उदंड प्रतिसादानंतर उत्तर मतदारसंघातील उपनगरीय भागामध्ये सुद्धा अमर यळ्ळूरकर यांना भरघोस पाठिंबा जनतेतून मिळत आहे. नेहरूनगर, अयोध्या नगर, सदाशिवनगर, जाधव नगर, हनुमान नगर आदी भागांमध्ये प्रचारादरम्यान मराठी लोकांनी अमर …

Read More »

भगव्या ध्वजांवर प्रशासनाची वक्रदृष्टी; नागरिकांत तीव्र नाराजी

  बेळगाव : निवडणूक आयोगाला मराठी भाषेसोबत भगव्यात ध्वजाचीही कावीळ झाल्याची प्रचिती शहापूर विभागात आली. शिवजयंती निमित्त शहापूर विभागात सर्वत्र भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. घरांवर व सार्वजनिक ठिकाणांवर लावण्यात आलेले भगवे ध्वज हटविण्याची मोहीम निवडणूक अधिकाऱ्यांनी हाती घेतली. मात्र मराठी भाषिक तरुणांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर …

Read More »

कामगारांच्या समस्या सोडविणार रमाकांत कोंडुसकर; उद्यमबाग परिसरात भेटीगाठी

  बेळगाव : विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समितीच्या पाठिशी राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी केले. श्री. कोंडुसकर यांनी, बेम्को हैड्रोलिक्स या नामांकित कंपनीसह उद्यमबाग परिसरातील विविध औद्योगिक वसाहतीला भेट देऊन …

Read More »

एपीएमसी व्यापाऱ्यांचा आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना एपीएमसी मार्केट यार्ड येथील कांदा, बटाटा वगैरे समस्त व्यापारीवर्गाने संपूर्ण जाहीर पाठिंबा दिला असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी …

Read More »

मुरलीधर पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुक्याचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर पाठिंब्याचे पत्र पाठविण्यात आले असून यामध्ये, आजवर ज्यापद्धतीने कर्नाटकातील मराठी सीमाबांधवांच्या पाठीशी एकजुटीने सर्व शक्तीनिशी उभा राहिला आहे. आगामी कर्नाटक विधानसभा …

Read More »

अनिल बेनके साहेब मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा : आम. रोहित पवार यांचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्रामध्ये आम्ही कन्नड मराठी दुजाभाव कधीच करीत नाही. मात्र बेळगावमध्ये मराठी भाषा संपवण्याचे षडयंत्र सरकारने रचले आहे. आमदार अनिल बेनके साहेब राष्ट्रीय पक्षात राहून मराठी माणसावर होणारा अन्याय तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागत आहे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा, अशी साद राष्ट्रवादीचे …

Read More »