Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

निपाणकर राजवाडा येथे विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाची सांगता

निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या देव बोलवायचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध देव व जग निपाणकारांचे  सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीचा जग,  श्री क्षेत्र श्रीशैल आंध्र प्रदेश महादेवाची पालखी, काठी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर, जोतिबांच्या काठीचे  निपाणकर राजवाड्यामध्ये पूजन झाले.  श्रीमंत दादाराजे …

Read More »

लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्काराने डॉ. आंबेडकर जयंती

निपाणी (वार्ता) : येथील लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीने  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून वेगळा उपक्रम राबविला. फाउंडेशनतर्फे नगरपालिकेच्या आवारातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये महात्मा फुले नगर मधील कबीर वराळे गुरुजी यांच्या प्रांगणामध्ये जयंती सोहळा पार पडला. …

Read More »

२७ मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक!

  बेळगाव : पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. शिवजयंती उत्सव दि. २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास …

Read More »

कर्नाटकच्या प्रचारसभेत राहुल गांधींचे अदाणी प्रकरणावरून भाजपावर टीकास्त्र

  कोलार : कर्नाटकात निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. भाजपाचा सुरूंगही फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला बळ मिळाल्याची …

Read More »

खानापूर समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील उद्या अर्ज दाखल करणार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील हे उद्या सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी कळविले. याबाबत बोलताना गोपाळ देसाई म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची तातडीची बैठक आज

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे चार वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव शिवजयंती उत्सव २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत त्यावर विचार विनिमय करून मिरवणुकीची तारीख ठरविण्यासाठी बेळगाव शहर तसेच शहापूर भागातील …

Read More »

ट्रान्समिशन टॉवर लाईनखाली आलं भरघोस पिकं

  बेळगाव : ट्रान्समिशन टॉवर लाईन खाली पीक येत नाही असे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांची तोंडे टॉवर लाईन खाली आलेली पिके पाहून बंद झाली आहेत. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यानी शिवारातील भात कापणी केली आणि शेतकऱ्यांना समाधारक भात पीक मिळाले., इतकेच नाही तर भाजी पीकही बऱ्यापैकी आल्याचे शेतकऱ्यांतुन सांगण्यात आले आहे..ग्रीन …

Read More »

हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

  बेळगाव (प्रतिनिधी) : हॉकी खेळाची क्रेझ आणि उत्साह बेळगावने जागतिक स्तरावर नेऊन ठेवला आहे असून हॉकीसाठी असलेली ही ख्याती पुन्हा मिळविण्यासाठी आणि तरुणांनी केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी युवक युवतींना पुढे यावे असे आवाहन उद्यमबाग पोलीस निरीक्षक आर. एस. बिरादार यांनी केले. ते हॉकी बेळगाव …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले हे रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ठीक आठ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर बेळगाव तालुक्याचे ग्रामदैवत असलेले उचगांव येथील …

Read More »

दक्षिणमधून रमाकांत दादा कोंडुस्कर समितीचे अधिकृत उमेदवार

  बेळगाव : दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रमाकांत दादा कोंडुस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 87 सदस्यांची निवड कमिटी नियुक्त करण्यात आली …

Read More »