Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची तातडीची बैठक आज

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे चार वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव शिवजयंती उत्सव २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत त्यावर विचार विनिमय करून मिरवणुकीची तारीख ठरविण्यासाठी बेळगाव शहर तसेच शहापूर भागातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व शिवभक्तांची तातडीची बैठक रविवार दि. १६ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेसमध्ये बोलाविण्यात आली आहे. तरी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दिपक दळवी आणि सरचिटणीस मदन बामणे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *