Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

  नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली …

Read More »

समर्थ इंग्रजी स्कूलचा क्रिडोच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

  खानापूर (प्रतिनिधी) : पूर्वापार चालत आलेल्या शैक्षणिक पध्दतीत बदल घडवून नविन संकल्पनेची जोड देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी लावण्यासाठी खानापूर येथील समर्थ इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांनी क्रिडोच्या माध्यमातून जागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. याजागतिक स्मार्ट शिक्षण पध्दतीच्या माध्यमातून क्रिडोच्या पध्दतीचा अवलंब करून एल के जी, यू …

Read More »

जितो लेडिस विंगच्या वतीने एप्रिल २ रोजी अहिंसा रन

  बेळगाव  : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडी विंगच्या वतीने 2 एप्रिल रोजी देशभरात अहिंसा रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आणि हा कार्यक्रम विक्रम मोडणारा कार्यक्रम असल्याचे जितो बेळगाव लेडीज विंगच्या अध्यक्षा शोभा दोड्डन्नवर यांनी सांगितले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जितो एपेक्स व्यवस्थापन मंडळाच्या …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये पुढील काळात बेळगाव सीमाभागात मराठी भाषा संवर्धनासाठी व संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले. 2023 हे साल गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव …

Read More »

लोंढा चेकपोस्टवर 25 मिक्सर पोलिसांच्या ताब्यात

  खानापूर : कोणताही परवाना किंवा खरेदी बिल नसलेली मिक्सर ग्राइंडरची अनधिकृत वाहतूक करणारे वाहन लोंढा (ता. खानापूर) चेक पोस्टवर खानापूर पोलिसांच्या मदतीने निवडणुकीच्या नोडल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. 62 हजार 500 रुपयांचे 25 मिक्सर ग्राइंडर व चारचाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी 29 चेकपोस्ट …

Read More »

कर्नाटक विधानसभा निवडणूक; 27 किंवा 28 मार्च रोजी घोषणा होण्याची शक्यता

  बंगळुरू : केंद्रीय निवडणूक आयोगाने एका पत्राद्वारे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. निवडणूक आचारसंहितेने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना प्रक्रियेची तयारी करण्यास सांगितले आहे. 27 किंवा 28 मार्चला विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व …

Read More »

कोगनोळीत तयार झालेल्या पुतळ्याचे रविवारी अमित शहांच्या हस्ते उद्घाटन

  निपाणी : कोगनोळी येथील प्रसिद्ध मुर्तीकार, शिल्पकार अमित डोंगरसाने यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 11 फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा तयार केला असुन नुकताच तो कर्नाटकातील बिदर तालुक्यातील गोरटा या गावी रवाना झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक …

Read More »

७.५ लाखांहून अधिक मद्यसाठा जप्त

  उद्यमबाग पोलिसांची कारवाई बेळगाव : बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून ७,५२,२६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळील एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. मजगाव परिसरात पाचव्या रेल्वे गेटनजीक एका वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती …

Read More »

म. ए. समिती आयोजित “शेतकरी मेळावा” उद्या; राजू शेट्टी यांची उपस्थिती

बेळगाव : 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. …

Read More »

रिक्षा चालकाच्या मुलीला एंजल फाउंडेशनचा मदतीचा हात

  बेळगाव : बेळगाव शहरातील कोनवाळ गली येथील एका रिक्षाचालकांच्या मुलीला शिक्षणासाठी हातभार लावत एंजल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देऊ केला आहे. एंजल फाउंडेशनच्यावतीने मीनाताई बेनके यांनी सदर मुलीची शाळेची फी भरून तिच्या पुढील शिक्षणासाठी मोलाचा हातभार लावला आहे. मुलांना शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना कोणालाही, कोणत्याही समस्या उद्भवू नयेत, …

Read More »