Saturday , November 7 2026
Breaking News

७.५ लाखांहून अधिक मद्यसाठा जप्त

Spread the love

 

उद्यमबाग पोलिसांची कारवाई

बेळगाव : बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून ७,५२,२६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळील एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.

मजगाव परिसरात पाचव्या रेल्वे गेटनजीक एका वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या उपविभागाचे एसीपी अरुणकुमार कोलुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आर. एस. बिरादार आणि त्यांचे सहकारी जी. एन. गर्लहोसूर, टी. सी. कुंचणूर, ए. एम. कांबळे, भरमा करेगार, सी. एस. हंचनाळ, आनंद चिदानूर आदींच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

या कारवाईत परशराम भाऊराव पट्टेकर (वय : ३१, रा. होसूर बसवाण गल्ली, खासबाग, शहापूर) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *