Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

वैजनाथ देवस्थान देवरवाडी नूतन स्थानिक सल्लागार उपसमितीकडून मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

  देवरवाडी : श्री वैजनाथ देवालय देवरवाडी ता.चंदगड येथे दि.१८ रोजी होणाऱ्या महाशिवरात्र महोत्सवाचे निमित्त साधून आज रविवार दि. १२/२/२०२३ रोजी नूतन वैजनाथ स्थानिक सल्लागार उपसमितीकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसरातील गवत, झुडपे, पालापाचोळा, स्वच्छ करून नूतन सल्लागार समितीने एक वेगळा आदर्श निर्माण केला. या स्वच्छता मोहिमेत …

Read More »

पिरनवाडी येथे म. ए. समितीची उद्या बैठक

    बेळगाव : पिरनवाडी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता रामदेव गल्ली येथील राम मंदिर येथे बैठक बोलाविण्यात आली असून बाळगमट्टी, खादरवाडी, मच्छे, मजगाव, झाडशहापूर, अनगोळ येथील स्थानिक नेते तसेच …

Read More »

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त घरावर भगवा लावा; रमाकांत कोंडूस्कर यांचे आवाहन

  बेळगाव : स्वाभिमानाचे, शौर्याचे प्रतीक समजला जाणारा भगवा प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने फडकवावा. येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म दिवस शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. हा दिवस प्रत्येक हिंदूंनी मराठी माणसांनी सण म्हणून साजरा केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज आपण हिंदू राष्ट्रात …

Read More »

यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

  बेळगाव : वडगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यरमाळ रोड परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीचा चावा घेतला आहे. मागील आठवड्यात वडगाव स्मशानभूमीजवळ कुसाणे नामक व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला व त्यांचे …

Read More »

“चलो मुंबई”च्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री देसाई यांची भेट

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज रविवारी सकाळी पाटण येथे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘चलो मुंबई’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर …

Read More »

हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

  बेळगाव : शहापूर येथील रहिवासी गीता भरमा कोळेकर या 37 वर्षीय मध्यमवर्गीय विवाहितेच्या जीविताच्या हितासाठी तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) शस्त्रक्रियेची अत्यंत गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. गीता भरमा कोळेकर यांना खुल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट सर्जरी) आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांचे पती …

Read More »

गोकाक येथील प्रसिद्ध होलसेल व्यापाऱ्याचे अपहरण व खून

  गोकाक : गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) यांचे शुक्रवारी अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी गोकाक पोलिसांत केली होती. पण आज त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) हे शुक्रवारी सायंकाळी ते सहाच्या सुमारास …

Read More »

गुंजी सरकारी मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे असोगा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

  खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंग देवस्थानचे दर्शन घेऊन मंदिरच्या परिसराला भेट दिली. मात्र मंदिर परिसर आणि नदीपात्रातील कचरा पाहून परिसर स्वच्छ करण्याचे ठरले लागलीच विद्यार्थी स्वच्छतेच्या कामाला लागले. नुकताच मकरसंक्रांतीच्या सनात भाविकांनी टाकलेल्या नदीपत्रात प्लास्टिक, देवांच्या तस्वीरी, निर्माल्य …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

  मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज …

Read More »

देशात तीन वर्षांत दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था

  अमित शहा; कॅम्पको सुवर्ण महोत्सव, भारत माता मंदिराचे उद्घाटन बंगळूर : देशात येत्या तीन वर्षांत दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली. मंगळूर जिल्ह्यातील पुत्तूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर कॅम्पको सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांना …

Read More »