Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर समितीकडे गोपाळ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे. अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत आहे. गोपाळ पाटील …

Read More »

रखडलेल्या गटार कामांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकासकामे सुरू आहेत.विकास कामांना चालना मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच काही ठिकाणी अर्धवट राहिलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना नव्या त्रासाला तोंड देण्याची वेळ आली आहे. असा प्रकार राम कॉलनी आदर्श नगर परिसरातील गटार बांधणी कामात …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द

    कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण निश्‍चितपणे कायमस्वरुपी काढणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस …

Read More »

निपाणीत उद्यापासून “अरिहंत चषक” क्रिकेट स्पर्धेचा थरार

उत्तम पाटील यांची माहिती : चार लाखाची बक्षीसे निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर शनिवारपासून (ता.११) अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रंदिवस प्रकाश झोतात आयोजित या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघासह इतर वैयक्तिक …

Read More »

घरकुल गैरव्यवहार करणाऱ्यावर कारवाई करा

वाळकी ग्रामस्थांची मागणी : ११ टक्के व्याज आकारण्याचे निर्देश निपाणी (वार्ता) : वाळकी (ता. चिकोडी) येथील ग्रामस्थांनी घरकुल गैरव्यवहार करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यास अनुसरून तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील प्रिया प्रकाश पाटील यांच्याकडून लाटण्यात आलेली रक्कम ११% व्याज आकारून परत घेण्याचे निर्देश दिले आहेत. …

Read More »

राज्य विधिमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

  बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (ता. १०) पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी गुरुवारी आमदारांना केले. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आजच्या अधिवेशनाची माहिती दिली, जे या विधानसभेचे १५ वे आणि शेवटचे अधिवेशन असेल. सर्वांनी …

Read More »

युवा नेते निरंजन सरदेसाई यांचा समितीकडे उमेदवारी अर्ज सादर

  खानापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी म. ए. समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निरंजन सरदेसाई यांनी आज आपल्या निवासस्थानी साहित्यिक म. ए. समितीचे नेते कै. उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपल्या समर्थकांसह पदयात्रेने जाऊन आपला उमेदवारी अर्ज …

Read More »

एससी/एसटी आरक्षण वाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

    बंगळूर : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) साठी रोजगार आणि शिक्षणात आरक्षण वाढवण्यासाठी राज्यघटनेच्या ९ व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. विधानसौध येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी …

Read More »

छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन करूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करा : रमाकांत कोंडूस्करांचा इशारा

बेळगाव : जनतेचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. कोणताही कार्यक्रम असो महाराजांना वंदन करूनच कार्यक्रमाला सुरू होते. परंतु बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येथे लावण्यात आलेली नाही. महाराजांची मुर्ती बसवूनच रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केली. संपूर्ण बेळगावकरांच्या …

Read More »

कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन

  बेळगाव : महिन्याभरापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आदर्श नगर राम कॉलनी येथील रहिवासी, नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले. 9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. …

Read More »