Wednesday , April 22 2026
Breaking News

युवा नेते निरंजन सरदेसाई यांचा समितीकडे उमेदवारी अर्ज सादर

Spread the love

 

खानापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी म. ए. समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निरंजन सरदेसाई यांनी आज आपल्या निवासस्थानी साहित्यिक म. ए. समितीचे नेते कै. उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपल्या समर्थकांसह पदयात्रेने जाऊन आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
पदयात्रेत रणजित पाटील हालगा, मुकुंद पाटील शिवोली, नगरसेवक स्थायी कमिटी चेअरमन विनोद पाटील, अशोक पाटील नागुर्डा, चापगाव ग्रा. पं. चेअरमन रमेश धबाले, नागेश भोसले कौंदल, टोपाण्णा कालमणकर, विठ्ठल शिपूरकर, वासु कालमणकर, तसेच कान्सुली, नागुर्डा, नागुर्डावाडा, विश्रांतवाडी, खानापूर व आदि ठिकाणाहून आलेले पंच मंडळी, ज्येष्ठ नागरिक, व युवा कार्यक्रते उपस्थित होते.
समितीकडे आपला अर्ज सादर केल्यानंतर बोलताना निरंजन सरदेसाई म्हणाले की, युवकांना एकत्र करून समितीच्या मुख्य प्रवाहात आणून रस्त्यावरील लढाई जिंकून आपल्याला महाराष्ट्रात जायचे आहे. त्यासाठी सर्वानी समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सचिव सीताराम बेडरे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, ऍड. अरूण सरदेसाई, अर्बन बँकेचे संचालक रवींद्र सरदेसाई व आदि नेतेमंडळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *