Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शैक्षणिक क्रांतीसाठी निरंतर कार्यरत

  मंत्री शशिकला जोल्ले : स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यांच्यामुळेच आपण मंत्रीपदापर्यंत पोहोचून आतापर्यंत निपाणी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. या कामासह शिक्षणालाही महत्त्व देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या निकालात काढल्या आहेत, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. …

Read More »

महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौर रेश्मा पाटील

  बेळगाव : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली असून महापौरपदी शोभा सोमनाचे यांची तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. यामुळे बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर व उपमहापौर पदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे. काँग्रेसने आज सोमवारी सकाळी महापौर …

Read More »

शिवठाणच्या युवकाची आत्महत्या

    खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या दिवसापूर्वीच कौंदलच्या काॅलेजच्या विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा सोमवारी दि. ६ रोजी शिवठाण (ता. खानापूर) येथील ज्ञानेश्वर धाकलू शिरोडकर (वय २३) याने समोरी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिवठाण येथील युवक सैन्यात भरती होण्यासाठी नंदगड …

Read More »

चित्रकला स्पर्धा रद्द करण्यामागे कोणाचा हात याची चौकशी व्हावी : रमाकांत कोंडुसकर

    बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ही चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. अनेक नेते राजकीय …

Read More »

निपाणी भागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न

आमदार चन्नराज हट्टीहोळी :अक्कोळमध्ये समुदाय भवनाचे भूमिपूजन  निपाणी (वार्ता) : विधानसभा परिषद निवडणुकीत या भागातील नागरिकांनी आपल्याला संधी दिली आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार सध्या कामाला सुरुवात केली आहे. निपाणी भागातील विविध विकास कामासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही विधानपरिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. अक्कोळ येथे त्यांनी आपल्या …

Read More »

शेडेगाळी गावच्या नामफलकाचे अनावरण

  खानापूर : ता. खानापूर मौजे शेडेगाळी येथील गावच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पूर्वीचा नामफलक हा गेले चार महिने जमीनदोस्त होऊन पडलेला होता परंतु या नामफलकाकडे ग्रामपंचायतचे लक्ष देखील नव्हते. ग्रामपंचायतचे पी डी ओ यांना शेडेगाळी गावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी वारंवार निवेदन देऊन देखील त्या नामफलकाची दखल घेतली नव्हती. शेवटी …

Read More »

जखमीच्या मदतीसाठी सरसावले मोरे पिता-पुत्र

    बेळगाव : जिथे मदतीची गरज असते तिथे देव स्वतः तरी धावतो किंवा किमान त्याचे दूत तरी पाठवतो हे काही खोटे नाही. अशीच एक घटना काल पुणे- बेंगलोर महामार्गावर घडली. महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी विजय मोरे व त्यांचा मुलगा …

Read More »

मोदेकोपच्या ३५ यल्लम्मा भक्तांना अन्नातून विषबाधा

    खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील यल्लम्मा भक्त दरवर्षी सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनाला जातात. त्याप्रमाणेच मोदेकोप (ता. खानापूर) येथील रेणुका देवीचे भक्त सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेवरून मोदेकोप गावाला आले. यल्लम्मा यात्रेवरून आलेल्या जवळपास ३५ भक्तांना अन्नातून विषबाधा झाली. लागलीच त्यांना खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व …

Read More »

महापौर पदासाठी शोभा सोमणाचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव आघाडीवर…

  बेळगाव : महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहू नगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांची नावे आघाडीवर असून दोघीही नगरसेविकांनी नामांकन दाखल केले आहे. भाजप कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत महापौर उपमहापौर उमेदवार अंतिम करण्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्या बैठकीत शोभा सोमाणाचे यांची महापौर तर रेश्मा पाटील …

Read More »

स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही : रमाकांत कोंडूस्कर

    बेळगाव : स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी उघडकीस आणला आहे. त्यांच्याशी जनतेने संपर्क साधून याबाबत माहिती दिल्याने रमाकांत कोंडुस्कर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. महिन्या आधी डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे परत एकदा काँक्रिटीकरण सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अशा हलक्या …

Read More »