Wednesday , April 22 2026
Breaking News

जखमीच्या मदतीसाठी सरसावले मोरे पिता-पुत्र

Spread the love

 

 

बेळगाव : जिथे मदतीची गरज असते तिथे देव स्वतः तरी धावतो किंवा किमान त्याचे दूत तरी पाठवतो हे काही खोटे नाही. अशीच एक घटना काल पुणे- बेंगलोर महामार्गावर घडली. महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी विजय मोरे व त्यांचा मुलगा ॲलन मोरे हे दोघेही धावले. त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी त्यांनी आपला प्रवास थांबविला.
पुणे -बेंगलोर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प झाली होती. सहा लेनचे काम सुरू असल्याने एका लेनवर संकेश्वर जवळ गर्दी वाढली होती. दुपारी बाराच्या सुमारास एक मोटरसायकलस्वार गर्दीतून निघून गेला. समोरील ट्रकचा अंदाज आला नसल्याकारणाने त्याचा अंदाज चुकला आणि मोटरसायकल थेट समोर थांबलेल्या ट्रकच्या मागच्या टायरमध्ये गेली. ट्रक थांबली. संपूर्ण मोटरसायकलचा चक्काचूर झाला होता. अखेर काही लोकांनी त्याला ट्रक खालून बाहेर काढले. देवाच्या कृपेने तो बचावला परंतु त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या, तात्काळ मदतीची गरज होती. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे व त्यांचा मुलगा ॲलन मोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष ममदापूर हे आपल्या गाडीने कोल्हापूरवरून बेळगावला परतत होते. सावली केअर सेंटरचा हॅपी स्ट्रीट कार्यक्रम आटोपून ते परत येत होते. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस पाहून त्यांनी तात्काळ गाडीतून उतरून धाव घेतली. जखमी व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स बोलवण्यात आली. व तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. जखमीना तात्काळ उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूकही सुरळीत करण्यात आली. त्याबद्दल अनेक वाहनधारकांनी दोघांचेही आभार मानले. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी देखील विजय मोरे यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *