Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

अथणी येथे वीज केंद्रात भीषण आग

  अथणी : येथील 110 केव्ही वीज केंद्रात भीषण आग लागली आहे. सदर आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरून संपूर्ण वीज केंद्राला आगीने वेढले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अथणी शहरातील विजापूर रोडला जोडलेल्या वीज केंद्रात सकाळी 09.15 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यावश्यक : चित्रपट निर्माते-अभिनेते चरणराज

  बेळगाव : विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगायचे असेल आणि चांगले नागरिक बनायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय.चौगुले भरतेश हायस्कूलच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांना बालवयातच दर्जेदार शिक्षण मिळाले तर …

Read More »

बालहक्क आणि संरक्षणासंदर्भात के. नागनगौडा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

  बेळगाव : लैंगिक हिंसा, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी, भीक मागणे यासह विविध कायदेशीर संघर्षांमधील मुलांची ओळख पटवून त्यांना मुख्यप्रवाहात आणणे तसेच मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. नागनगौडा यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बाल न्यायालय कायदा, आर.टी.ई., बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून …

Read More »

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, नऊ प्रवाशांचा मृत्यू

  रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी …

Read More »

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

  बेळगाव : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 आहे. बेळगाव उज्वल नगर जवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला. पुण्याहून बेंगळुरूच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याची माहिती स्थानिकांनी …

Read More »

पीडीओ अरुण नायक हेच कायम रहावेत; येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने येळ्ळूर गावासाठी पी.डी.ओ. अरुण नायक हेच कायम रहावेत. यासाठी बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना बुधवार (ता. 18) रोजी निवेदन देण्यात आले. येळ्ळूर भाजपा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने, तसेच गावातील काही सुज्ञ नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या …

Read More »

मर्चंट्स सोसायटीच्या वतीने प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार

  बेळगाव : अनसूरकर गल्ली येथील दि. बेळगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नारायण चौगुले हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकेचे संचालक आणि माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर तसेच समर्थ …

Read More »

कंग्राळ गल्लीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  बेळगाव : येथील विजया ऑर्थो आणि ट्राॅमा सेंटरचे डाॅ. रवि बी. पाटील (एम एस ऑर्थो) आणि सहकारी यांच्यावतीने कंग्राळ गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, हाडातील खनिजांची घनता इत्यादी …

Read More »

कोल्हापूरवासीयांकडून बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन!

  कोल्हापूर : भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याविरोधात मराठी माणूस पेटून उठला यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. सीमावासीयांच्या नेहमीच पाठीशी असणाऱ्या कोल्हापूर वासीयांनी बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी मध्यवर्तीचे …

Read More »

नियती फौंडेशच्या वतीने इटगी येथे हळदीकुंकू समारंभ

  खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या. नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या …

Read More »