Sunday , July 26 2026
Breaking News

कंग्राळ गल्लीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Spread the love

 

बेळगाव : येथील विजया ऑर्थो आणि ट्राॅमा सेंटरचे डाॅ. रवि बी. पाटील (एम एस ऑर्थो) आणि सहकारी
यांच्यावतीने कंग्राळ गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, हाडातील खनिजांची घनता इत्यादी विषयांवर सल्ला देण्यात येऊन औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. डाॅ. रवि पाटील यांचे सहकारी श्री. किरण एस सांबरेकर, डाॅ. सोमशेखर डाॅ. शिंदोळकर, डाॅ. नीलम, डाॅ. वरुण, डाॅ. नंदिश रोट्टी, श्री. प्रताप यांनी तपासणी कार्यात सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री. किरण एस. सांबरेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले. गल्लीच्या
वतीने उपसरपंच अनंतराव जाधव यांच्याहस्ते डाॅ. रवि पाटील यांचा सन्मान करण्यात आला. डाॅ. पाटील यांनी शिबिराचे उद्दिष्ट सांगून चांगले आरोग्य राखण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले. श्री. मालोजी अष्टेकर यांनी शिबिराबद्दल आभार मानले. डाॅ. रवि पाटील हे जनसेवा हीच ईश्वर
सेवा असे मानून कार्य करतात असे ते म्हणाले. सेंटरच्या वतीने पंच मंडळींचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गल्लीतील पंचमंडळाचे शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, गोपाळ सांबरेकर, बाबुराव कुट्रे इ. यावेळी हजर होते. गल्लीतील अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *