Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

यंग बेळगाव फाउंडेशनने राबविला स्तुत्य उपक्रम!

  बेळगाव : नानावाडी येथील अंगडी कॉलेज समोरील अर्धवट अवस्थेतील काँक्रीटच्या धोकादायक रस्त्यापासून वाहन चालकांना सावध करण्यासाठी यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे तेथे लाल बावट्याची फीत बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र हे करताना सदर कॉलेज समोर येईल रस्त्याच्या एका बाजूच्या …

Read More »

कोगनोळीत 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पन्न

  कोगनोळी, ता. 12 : येथील शेतकरी राजश्री दादासो पाटील (करडे) यांनी 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजश्री पाटील यांची हणबरवाडी रोडवर सर्वे नंबर 497 मध्ये शेती आहे. या शेतीमध्ये सुरुवातीला दहा ट्रेलर शेणखत टाकून घेतले. त्यानंतर उभी आडवी नांगरट करून …

Read More »

ऊसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये घेणारच

राजू पोवार : जैनवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : बेळगावात १९ डिसेंबर रोजी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये द्यावेत, वजनातील काटामारी थांबली पाहिजे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चिकोडी …

Read More »

मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने निवेदन

  बेळगाव : कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर “चलो सुवर्णसौध”ची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने आज सोमवारी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ कागेरी …

Read More »

अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

  मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला पण सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर …

Read More »

शाई फेकण्याचा प्रकार असमर्थनीय; पण शाई फेक प्रकरणाचे खापर पत्रकारांवर फोडणे संतापजनकच

  पत्रकारिता करणे गुन्हा आहे का? – एस.एम. देशमुख मुंबई : पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक …

Read More »

सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सीमाभाग केंद्रशासित करा

  बेळगुंदी साहित्य संमेलनात ठराव बेळगाव : सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, असा ठराव आज पार पडलेल्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनात पारित करण्यात आला. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आज रविवारी बेळगुंदी येथे मरगाई मंदिराच्या आवारात १७ वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन विविध सत्रात पार पडले. …

Read More »

माजी मंत्री रमेश जारकीहोळी समर्थकांची नागपूर वारी

  बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपले समर्थक आणि विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन नागपूरवारी केलेली आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मराठा समाजातील हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर त्याचप्रमाणे दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण जाधव यांना घेऊन माजी मंत्री व …

Read More »

ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : सर्वच बाबतीत मागासलेल्या बेळगावच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मी गेली साडेचार वर्षे प्रथम प्राधान्याने काम करत आहे. मुलींसह कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा माझा हेतू आहे. आगामी काळात उच्च शिक्षणाची व्यवस्था घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. …

Read More »

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या दहावी व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला रविवार दि. ११ डिसेंबर रोजी दुसऱ्या दहावी व्याख्यानमालेला विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला. चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलमध्ये ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे पदाधिकारी बी. जे. बेळगांवकर, एम. डी. पाटील, श्री. …

Read More »