Friday , June 5 2026
Breaking News

अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

Spread the love

 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला पण सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली.

देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती
देशमुखांना जामीन मंजूर केल्याच्या न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामिनाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *