Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

राज्य स्तरीय उत्तम शिक्षक पुरस्काराने माणिक शिरगुप्पे सन्मानित

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित तवंदी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमधील मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक माणिक शिरगुप्पे  यांना राज्यस्तरीय उत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बंगळुरू येथील शिक्षण खात्याच्या आयुक्त कार्यालयामधील सभा भवनात शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. माणिक शिरगुप्पे यांनी आज पर्यंत क्रीडा शिक्षक …

Read More »

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह सहा जणांचा मृत्यू

  केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवलं आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. उत्तराखंडमधील फाटा भागात हा अपघात झाला. यात सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, …

Read More »

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती; सचिवपदी जय शाह कायम

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (१८ ऑक्टोबर) बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण पार पडली. या सभेत बिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिन्नी सौरव गांगुली यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे जय शाह हे सचिवपदी कायम असतील. ‘आयसीसी’च्या …

Read More »

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना

  मुंबई : औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर …

Read More »

मणतुर्गा, रुमेवाडी, असोगा येथे खानापूर समितीची जनजागृती

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका, मराठी आपला बाणा मराठी आपली संस्कृती, मराठी आमचे अस्तित्व मराठी आमची ओळख. ही ओळखच पुसण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून सुरू असताना मेंढरासारखे तुम्ही-आम्ही स्वस्त बसून होणार आहे का? ६० वर्षे समितीचे एकहाती नेतृत्व मान्य करून तालुक्याची धुरा समितीच्या हाती सोपविणारे तुमचे आमचे आई-वडील, आजी-आजोबा …

Read More »

नंदगड ड्यॅमची दुर्दैवी अवस्था

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावाच्या पश्चिमेस असलेल्या धरणाची अवस्था फार बिकट झालेली आहे. सदर धरण हे माजी आ. कै. बसपान्ना आरगावी यांनी नंदगड गावाच्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बांधले होते. या नंतर नंदगड धरणाचा आणि म्हणावा तसा गावाचा विकास झालेला नाही. आजपर्यंत कुठल्यापन लोकप्रतिनिधींनी धरणाचा विकासाबद्दल विचार …

Read More »

भिवशीत उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन

  विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भिवशी येथे युवा नेते उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. प्रारंभी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्रा. जोशी व मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. …

Read More »

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्या

राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : परतीच्या पावसाने चिकोडी तालुक्यांमध्ये थैमान घातलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीसह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले तर तंबाखू ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड नैराष्यात आहे. समोर दिवाळी सारखा सण असतांना शेतकरी आसमानी …

Read More »

जबाबदारी ओळखून काम करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना

बंगळूर : राज्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या घरे आणि पिकांना मदतीचे वाटप समाधानकारक नाही, असे म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जबाबदारी ओळखून काम करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. विधानसौध येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकीऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, अपेक्षित प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आलेली …

Read More »

उद्या बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा; रॉजर बिन्नी होणार 36 वे बीसीसीआय अध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची मंगळवारी अर्थात 18 ऑक्टोबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. यावेळी भारताचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. बिन्नी हे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष असून त्यांना राज्य संस्थेतून पायउतार व्हावं लागणार आहे. याशिवाय आयसीसी चेअरमनबद्दलही …

Read More »