Thursday , May 28 2026
Breaking News

शहाजी महाराजांच्या समाधिस्थळाच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद

Spread the love

 

बेळगाव : अथणी शहरातील शिवाजी चौकात रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अथणी व अथणी तालुका मराठा समाज संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. ते सर्व समाजाच्या प्रेमास पात्र होते. संपूर्ण देशाचा ते अमूल्य ठेवा असून त्यांच्या विचारधारा आजही सर्वांसाठी आदर्श आहेत. दावणगेरे जिल्ह्यातील होदिगेरी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या समाधिस्थळाच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, बेळगाव येथे एक कोटी रुपये खर्चून स्मारक उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कामगार मंत्री संतोष लाड, मराठा जगद्गुरू मंजूनाथ भारती स्वामी, गच्चीन मठाचे शिवबसव स्वामी, मोटगी मठाचे प्रभु चन्नबसव स्वामी, शेट्टर मठाचे मरुळसिद्ध स्वामी, कवळगुड्डाचे सिद्धयोगी अमरेश्वर महाराज, ककमरीचे अभिनव गुरुलिंग जंगम स्वामी, आमदार रमेश जारकीहोळी, विक्रमसिंह सावंत, समाधान अवताडे, मारुतीराव मुळे, माजी आमदार महेश कुमठळी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, शहजान डोंगरगाव, अरविंद देशपांडे, नगराध्यक्ष शिवलीला बुटाळे, स्थायी समिती अध्यक्ष दत्ता वास्टर, नेते, शिवभक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इंधन दरवाढ व खतांच्या किमतींविरोधात शेतकऱ्यांचा आवाज; दर नियंत्रणाची मागणी

Spread the love  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *