Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

  नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. …

Read More »

विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

  मुंबई : जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली …

Read More »

सरकारी मराठी शाळा नं. 19 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

  बेळगाव : सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा नं. 19 या शाळेतील 1995-96 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तब्बल 30 वर्षानंतर गेल्या रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. टिळकवाडीतील न्यू उदय भवन येथे आयोजित हा स्नेहमेळावा तब्बल 50 हुन अधिक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थितीने अविस्मरणीय ठरला. प्रारंभी शाळा नं. 19 च्या निवृत्त …

Read More »

रामदुर्गमध्ये घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग शहरात मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू असून सदर घटना शहरातील निंगापूर पेठ येथील महादेव मंदिराजवळ घडली. ७५ वर्षीय वामनराव बापू पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घराचे छत कोसळले आणि मातीत गाडले गेले. …

Read More »

माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

  नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सीपी राधाकृष्णन यांचे आव्हान …

Read More »

धर्मस्थळ अपप्रचाराच्या निषेधार्थ भर पावसात भव्य मोर्चा

  बेळगाव : गेल्या एक महिन्यापासून हिंदू धार्मिक तीर्थस्थान धर्मस्थळाविषयी निराधार आरोप करून खोटा प्रचार करून धर्मस्थळ नाव कलंकित करण्याच्या घटना घडत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे भव्य शक्तीचे दर्शन घडले. यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सदर मुद्दयाबाबत माहिती …

Read More »

गोकाक येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक शहरात घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फरिदाबानू शकीलअहमद कानवाड वय ५० असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. गंभीर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा; गरज नसल्यास घराबाहेर पडू नका : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जिल्हावासियांना आवाहन

  पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर …

Read More »

तब्बल २१ वर्षांनी मुलगा झाला; बाळाला पाळण्यात ठेवून कृष्णेच्या पात्रात प्रवास करत दाम्पत्याने फेडले नवस!!

  सांगली : सांगलीत आज नवस फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्रथा आज सांगलीकराना पाहायला मिळाली. लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर नवसाने एका दाम्पत्याला मुलगा झाला. याच नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेऊन स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत हा दाम्पत्याने नवस फेडले. कोयना धरणातून सोडण्यात …

Read More »

गणेशोत्सव व्यापारी बंधू खडेबाजार मंडळाकडून मुहूर्तमेढ मोठ्या दिमाखात संपन्न

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी बंधू जय भवानी चौक खडेबाजार बेळगावच्या तर्फे गणेश मंडप मुहूर्तमेढ पूजन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळचे अध्यक्ष विजय जाधव, बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव कार्याध्यक्ष सुनील जाधव, यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ …

Read More »