Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन मधील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी नागरिकांनी व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी …

Read More »

बस दरीत कोसळून ३२ प्रवाशांचा मृत्यू, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

  पौडी गढवाल : उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस वऱ्हाडींना घेऊन हरिद्वारमधील लालढांग येथून काडागावकडे जात होती. सिमडी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत पडली. पौरी गढवाल जिल्ह्यातील बीरोखाल भागात रात्री …

Read More »

बिष्टम्मा देवीच्या चरणी आमदार अंजलीताई निंबाळकर!

  खानापूर : आज दुपारी खानापूरच्या कार्यसम्राज्ञी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी कक्केरी येथे जाऊन बिष्टाम्मा देवीचे दर्शन करून आशिर्वाद घेतले. खानापूर तालुक्यातील सामान्य जनता, कष्टकरी, कामगार वर्ग, शेतकरी, या सर्वांचे जनजीवन सुखकर व्हावे असे देवीकडे साकडे घातले असल्याचे आमदार ताई म्हणाल्या. आमदार अंजलीताईंनी देवीची ओटी भरली. मंदिर कमिटीतर्फे आमदार …

Read More »

कंटेनरची वडाप रिक्षाला धडक; १० ठार तर ७ जखमी

  गुजरातमधील वडोदरा येथील घटना वडोदरा : कंटेनरने एका वडाप रिक्षाला दिलेल्या धडकेत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला. गुजरातमधील वडोदराजवळ राष्ट्रीय महामार्गावरील दार्जिपुराजवळ आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. कंटेनर ट्रकने प्रवासी घेऊन जाणाऱ्या तीन दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांना वडोदरा शहरातील रुग्णालयात …

Read More »

इदलहोंड ग्रा. पं. अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकरानी स्वखर्चातून केली इदलहोंड रस्त्याची दुरूस्ती

खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) गावच्या इदलहोंड ते बेळगांव पणजी महामार्गाच्या फाट्यापर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशातून तसेच वाहन धारकातून तसेच दुचाकी वाहन धारकातून कमालीची नाराजी पसरली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही देण्यात आले होते. मात्र संबंधित …

Read More »

सौंदलगा येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात महिलेसह मुलगी ठार

  सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुर्ली फाटा येथील अन्नपुर्णा हाॅटेल समोर धावत्या दुचाकीचा टायर पंक्चर होऊन झालेल्‍या अपघात महिला व युवती ठार झाल्या. तर दुचाकीस्वार व बालक गंभीर जखमी झाले. लक्ष्मी आनंद कोप्पद (वय २५, रा. मुगळीहाळ, ता. सौंदत्ती व भाग्यश्री सागर वाकमी …

Read More »

मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोगनोळी :  येथील लाखो जणांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन कर्नाटक राज्य धर्मादाय हाज वक्फ मंत्री शशिकला जोल्ले व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले. श्री अंबिका देवीची ओटी भरून गोरगरिबांच्या हितासाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार फंडातून मंजूर करून दिलेल्या अंबिका भवनच्या कामकाजाची पाहणी केली. कोणत्याही प्रकारची …

Read More »

श्री दुर्गामाता दौडने देशाभिमान जागविला : पवन कत्ती

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुर्गामाता दौडने युवा वर्गात देशाभिमान जागविण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी सांगितले. ते मंगळवारी श्री दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. पवन कत्तीं, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद …

Read More »

जिल्हास्तरीय माध्यमिक क्रिकेट स्पर्धेत बेळगाव शहराला विजेतेपद

  बेळगांव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो क्रिकेट मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगांव शहराने विजेतेपद पटकाविले. उपांत्य सामन्यात बेळगांव तालुक्याने खानापूर तालुक्याचा 10 धावांनी पराभव केला. तर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगांव शहराने 14 षटकात 1 बाद 156 धावा केल्या त्यांच्या सिद्धेश …

Read More »

विजयादशमीनिमित्त उद्या येळ्ळूरमध्ये भारुड भजनी कार्यक्रम

  येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही विजयादशमी निमित्त श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर शिओली (ता. खानापूर) येथील श्री हनुमान भजनी मंडळाचा भारुड भजनी कार्यक्रम बुधवार (ता. 5) रोजी रात्री 10-00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर हे …

Read More »