Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या सभासदांना पंधरा टक्के तर कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस

  पन्नास टक्के वेतनवाढ : अमित कोरे यांची माहिती अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व रोजंदारी करमाऱ्या कर्मचाऱ्यांसह उद्योजक व्यावहारिक व मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामीण भागात सहकारी संस्थानच्या माध्यमातून देण्यात येणारे आर्थिक साहाय्य त्यामुळेच त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारले असून त्याचबरोबरच सहकारी संस्थेच्या विकासासाठी गेल्या 34 वर्षांपासून सहकार क्षेत्रात …

Read More »

हरवलेल्या मानसिक युवकाला दिला मदतीचा हात

  बेळगाव : केस कापण्यासाठी गेलेला धामणे जवळील मास्केनट्टी या गावातील फकीरप्पा पाटील हा 36 वर्षीय युवक गावातून दिवसभर फिरत फिरत रात्री अनगोळ येथे फिरताना आढळून आला. त्याला पाहून तेथील युवकांनी त्याची चौकशी केली व त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने पाहून त्यांनी टिळकवाडी पोलीस स्टेशनला कळवले. युवकाची मानसिक स्थिती लक्षात …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागात विकास क्रांती घडवली : चन्नराज हट्टीहोळी

  बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गेल्या साडेचार वर्षात बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची क्रांती घडवून आणली असून, आगामी काळात विकासाला गती देणार असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. पंत बाळेकुंद्री गावातील बालमुकुंद कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुदानातून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार होण्यापूर्वी …

Read More »

संकेश्वर श्री गजानन सौहार्द अध्यक्षपदी दिपक कुलकर्णी

  तर उपाध्यक्षपदी डॉ. गिरीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री गजानन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिपक व्ही. कुलकर्णी, उपाध्यक्षपदी डॉ. गिरीश बी. कुलकर्णी यांची उर्वरित कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. डी. लक्षाणी यांनी काम पाहिले. संस्थेचे दिवंगत चेअरमन डी. …

Read More »

अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत मिळेल गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

  नवी दिल्ली : गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. विवाहित किंवा अविवाहित सर्व स्त्रियांना गर्भ राहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपात करता येऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. याच निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वैवाहिक बलात्काराविषयीही मत नोंदवलं आहे. महिलेच्या मनाविरुद्ध नवऱ्याने संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा …

Read More »

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार!

  नवी दिल्ली : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो विश्वचषकाला मुकणार आहे. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला …

Read More »

आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिध्दनाथ यात्रा 11 ऑक्टोंबरपासून

कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (तालुका निपाणी) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हालसिद्धनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाच दिवशीय यात्रा मंगळवार तारीख 11 ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेनिमित्त तारीख 11 ते 15 ऑक्टोंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार तारीख 11 रोजी सकाळी श्रींची पालखी …

Read More »

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍याला अटक

बेळगाव : रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला रायबाग पोलिसांनी अटक केली. गेल्या 4 फेब्रुवारी रोजी बावन सौंदत्ती येथील एटीएमचा दरवाजा लोखंडी रॉडने फोडून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती. त्या फुटेजच्या आधारे रायबाग पोलिसांनी खाजासाबला अटक केली आहे. या प्रकरणी …

Read More »

महात्मा गांधी जयंती निमित्त कावळेवाडीत गुणवंतांचा सन्मान

  बेळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गांधीजयंती निमित्त रविवारी दोन ऑक्टोबर रोजी कला, ज्ञान, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव नंदिहळी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी प्रतिमा पूजन मोहन मोरे, लालबहादूर शास्त्री फोटो पूजन मनोहर बेळगावकर …

Read More »

खानापूर रेल्वे स्टेशन रोड शाहूनगरात दुर्गा माता पुजन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शाहू नगरात दुर्गा माता पुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री दुर्गा माताच्या आरतीला उपस्थित भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, भाजपचे नेते व महालक्ष्मी साखर कारखान्याचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, खानापूर भाजप मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, सुनिल नायक, तसेच शाहूनगरमधील नागरिक दिलीप …

Read More »