Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

सौंदत्ती यात्रेसाठी धावणार अतिरिक्त बस

  बेळगाव : नवरात्रोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-सौंदत्ती मार्गावर तब्बल 7 अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. सोमवारपासून ही अतिरिक्त बससेवा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनचे विभागाचे नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय …

Read More »

संकेश्वरात वीस रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मुरगुडे मेमोरियल, एम.एम. जोशी नेत्रविज्ञान संस्थेच्या वतीने नुकतीच मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली. शिबिराचे आयोजन दिवंगत डॉ. श्वेता सचिन मुरगुडे वाढदिवस स्मरणार्थ श्रीमती शैलजा मुरगुडे यांनी केले होते. मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ बहुसंख्य लोकांनी घेतला. शिबिरांतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास गरीब वीस …

Read More »

महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. ९ ऑगस्टला झालेल्या विस्ताराला दीड महिना उलटल्यानंतर अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचं वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकरांना मुंबई …

Read More »

संकेश्वरातील जुन्या पी. बी. रस्त्यावर वाहनांची धडामधुडकी…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते शेट्टीमनी दुकानापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर (पी. बी.) रोड चौपदरीकरण करण्यात आला आहे. रस्ता चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांनी अर्धवट कसेबसे केलेले दिसताहे. पोस्ट कार्यालय हरमन टी स्टॉल समोरच्या रस्त्यावरील चर अपघाताला आमंत्रण देणारी ठरल्याचे कुमार बस्तवाडी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, …

Read More »

आरसीयूने दिला विद्यार्थ्यांना दिलासा!

  बेळगाव : अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती निश्चित रकमेपेक्षा कमी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी यंदाची शैक्षणिक फीदेखील भरली आहे. मात्र उर्वरित रकमेचा तगादा विद्यापीठाकडून लावण्यात आल्याने विद्यापीठाविरोधात अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी आज एल्गार पुकारत आंदोलन छेडले. बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठाविरोधात एस सी- एस टी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या …

Read More »

खानापूर पिकेपीएस वार्षिक सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोपाने गोंधळ

  खानापूर : तालुक्यातील सर्वात मोठी असलेली पिकेपीएस संस्थेची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा जांबोटी रोडवरील शुभम गार्डनच्या हॉलमध्ये अनेक नाट्यमय घडामोडींनी पार पडली. संस्थेला चालू वर्षी 30 लाखाचा नफा झाला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नारायण कार्वेकर हे होते. संस्थेचे व्यवस्थापक अहवाल सादर करत असताना मधेच उठून शिवाजी पाटील …

Read More »

सत्तांतर झाले नसते तर फॉक्सकॉन प्रकल्प आज महाराष्ट्रात असता : आदित्य ठाकरे

  पुणे : शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला कसा गेला बद्दल पुण्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रानं गुणवत्तेच्या जोरावर आतापर्यंत विविध कार्यालय आणि उद्योग राज्यात खेचून आणले होते. महाराष्ट्रात जो प्रकल्प १०० टक्के येणार हे …

Read More »

समाजसेवा हा जीवनाचा भाग होऊ द्या : गणपतराज चौधरी

  बेळगाव : प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुरेसा पैसा कमवू शकतो. पण कमावलेला पैसा साठवण्याऐवजी परोपकार आणि समाजसेवेत गुंतले पाहिजे. समाजसेवा हा जीवनाचा भाग झाला पाहिजे, असे मत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे जितो एपेक्सचे अध्यक्ष गणपतराज चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शनिवारी बेळगावातील उद्यमबाग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जितो …

Read More »

मल्लिकार्जुन सौहार्दला १३ लाख रुपये नफा, सभासदांना 20 टक्के लाभांश जाहीर

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री मल्लिकार्जुन अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात १३ लाख ७४ हजार रुपये नफा झाला असून सभासदांना 20 टक्के लाभांश देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डी. पट्टणशेट्टी यांनी सांगितले. ते मल्लिकार्जुन सौहार्दच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे …

Read More »

प्राथमिक कृषी पत्तीन हंचिनाळ संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  संस्थेची दोन कोटी 58 लाखाची उलाढाल हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात बारा वर्षापासून असलेल्या प्राथमिक कृषी सहकारी संघ नियमित हंचिनाळ या संघाची 2021-22 सालची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अरुण लक्ष्मण चौगुले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रम्हनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन श्री. …

Read More »