Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनी सर्वसामान्य जनतेचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत : महांतेश कवटगीमठ

  अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी समाजातील प्रत्येक नागरिकांना अर्थसाह्य पुरवठा करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास सहकारी संस्था बळकट होऊ शकतात. स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केल्यामुळे आज जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरले गेले आहे. …

Read More »

संगीत शिक्षिका निवेदिता नवलगुंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेळगाव : निवेदार्पण अकादमी ऑफ म्युझिकच्या संचालिका निवेदिता नवलगुंद यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 49 वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे 1.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. बेळगावातील चन्नम्मा नगर येथे गेल्या काही वर्षांपासून त्या संगीत अकादमी चालवत होत्या. …

Read More »

बोरगावमधील भंगार दुकान फोडून दहा लाखाची चोरी

सीसीटीव्हीची मोडतोड : परिसरात भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री महालक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकान फोडून सुमारे दहा लाखांहून अधिक रुपयांचे भंगार चोरट्यानी लंपास केल्याची घटना रविवारी (ता.११) पहाटे उघडकीस आली. चोरट्यानी दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून हार्ड डिस्क गायब करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केले आहे. इतकी …

Read More »

भारत नगर, शहापूर येथील इमारतीचा जीर्ण भाग कोसळला

  बेळगाव : भारत नगर, शहापूर येथील बाजार रोड (मुख्य रस्ता) वरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळेचा उत्तरेकडील भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पान टपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले. पाटील कुटुंबातील महेश …

Read More »

चोर्ला-कणकुंबी महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

खानापूर (प्रतिनिधी) : चोर्ला-कणकुंबी महामार्गावरील कणकुंबी विश्रामधामच्या समोर दुचाकीस्वाराला ४०७ टेम्पोने ठोकरल्याने रविवारी दि. ११ रोजी दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी दि. ११ रोजी दुपारी कणकुंबी विश्रामधामच्या समोर चिगुळे (ता. खानापूर) गावचा सुपूत्र काशीनाथ प्रकाश गावडे (वय २२) हा दुचाकीवरून जात असताना ४०७ टेम्पोची …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून

  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळी ठरण्याची शक्यता बंगळूर : उद्यापासून (ता. १२) सुरू होणारे विधिमंडळाचे दहा दिवसांचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी भ्रष्टाचारासह कथित घोटाळे, पाऊस आणि पायाभूत सुविधांच्या समस्या यासारख्या अनेक मुद्द्यांवर बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत चालणारे हे …

Read More »

सदलगा- एकसंबा रस्त्यावर धोकादायक कंट्रोल डीपी उघड्यावर

  सदलगा : येथील सदरगा- एकसंबा रस्त्यावर बाबासाहेब होगार यांच्या घरासमोर रस्त्यालगतच पुरसभेच्या अखत्यारीत येत असलेले हेस्कॉमचे पथदीपचे कंट्रोल डीपी बॉक्स उघड्याच अवस्थेत दिसून येत आहेत. तिथे आतमध्ये फ्यूज आदी सर्वकाही उघड्यावर आणि जमिनीपासून केवळ एक दीड फूट उंचीवर आहे. लहान मुलांच्या अल्लड चाळ्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. नुकतेच दोन …

Read More »

दूधगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ

नदी काठावरील पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता; शेतकरी संकटात महापुराची धास्ती.….. सदलगा : काळम्मावाडी व राधानगरी पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार वृष्टी झाल्याने तसेच सदलगा निपाणी परिसरात काल पासून अविश्रांत पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दूधगंगा नदीचे रविवार सकाळपासून पाण्याची पातळी पाच फूटाने वाढल्याने पाणी पात्रा बाहेर पडले आहे. …

Read More »

अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या वर्धापन दिनाचे छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते उद्घाटन

पटना : बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे उद्घाटन युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते झाले. कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर. एल. चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी 75 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली होती. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले …

Read More »

नेरसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांचा सन्मान

  खानापूर (प्रतिनिधी) : नेरसेवाडी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांना यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरसेवाडी गावच्या ग्रामस्थाच्यावतीने तसेच शाळा सुधारणा कमिटीच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गोपाळ पाटील यांचा सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजिलकोडल पंच कमिटीचे अध्यक्ष सुरेश …

Read More »