Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग!

  बेळगाव : बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या स्टार एअरच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी उड्डाण घेतलेले स्टार एअरचे विमान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर पुन्हा सांबरा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान १५ मिनिटे हवेतच उडवले आणि लँडिंग केले. सुदैवाने, …

Read More »

युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

  खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवारी हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हलशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शाळामधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी निवृत्त सुभेदार शंकर देसाई यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात पूजन करण्यात आले. माजी …

Read More »

डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या खानापूर ते नंदगड “वोटर अधिकार पदयात्रा”

  खानापूर : संविधानाने “एक व्यक्ती एक वोट” हा अधिकार दिलेला असताना निवडणूक आयोग वोटर लिस्टमध्ये घोळ घालत असून हा सरळ सरळ संविधानावर आघात असून निवडणूक आयोग वोट चोरी करत असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे …

Read More »

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ उत्साहात संपन्न

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे …

Read More »

‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा उत्साहात साजरा; बाप्पाला बघण्यासाठी हजारो बेळगावकर रस्त्यावर

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील डोळे दीपतील बेळगावच्या राजाचं सुंदर रूप पाहायला मिळालं. दरवर्षी गणेशोत्सवात ‘बेळगावचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर ग्रामीण भागातील भाविक आगमन सोहळ्याला धर्मवीर संभाजीराजे चौकात येत असतात. शुक्रवारी रात्री 11 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकात 18 फूट उंचीच्या ‘बेळगावचा राजा’चे दिमाखात आगमन होताच राजाचे आगमन …

Read More »

केएसआरटीसी बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडक: तिघांचा मृत्यू

  रामनगर : बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडक दिल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बागलकोट येथील निलाव्वा हरडोळी (40) आणि जळीहाळ येथील गिरिजाव्वा बुडन्नावर (30) यांचा समावेश आहे. एका 45 वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही. …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्हा आघाडीवर होता : पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक लढाईतून भारतीयांना मिळालेल्या स्वातंत्र्याने जगाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याने जगात लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया रचला आहे. स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव जिल्ह्याची भूमिका कमी नाही. देशाला अतुलनीय सेनानी, खरे देशभक्त आणि स्वाभिमानी …

Read More »

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू

  राजनांदगाव : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील चिरचरी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालक गंभीर जखमी आहे. इंदूरमधील सहा मित्र उज्जेनला भेट देऊन ओडिशाच्या दिशेने जात होते. परंतु, चिरचरी राष्ट्रीय महामार्ग क्राँसिंगजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यामुळे …

Read More »

दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू

  नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील हुमायू येथील मकबऱ्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. दर्गा शरीफ फत्ते शाहच्या आतील खोलीतील भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित प्रकल्प लवकरच सुरू होणार; पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगावकर जनतेचा बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्प, नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आणि पत्रकार भवनाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढील महिन्यात उद्घाटन करतील, असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर पार पडलेल्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पाटबंधारे …

Read More »