Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

75 मीटर लांबीची भव्य तिरंगा रॅली

  बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी संपूर्ण देशात नवचैतन्य पसरले आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात तिरंगा झेंडे फडकत आहेत. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या लाखो स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचे एक महान कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली. धर्मवीर संभाजी मैदान, …

Read More »

हालात्री नदीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या, नाल्याना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने शिरोली, शिरोलीवाडा, हेम्माडगा, डोगरगांव, नेरसा, अशोकनगर आदी भागातील जवळपास २५ खेड्याचा संपर्क खानापूर शहराशी तुटला त्यामुळे हायस्कूल, काॅलेजच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळावा संपन्न

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात झाला. या वर्षाचे नियोजन करण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता. सर्वप्रथम सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर …

Read More »

पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर

आ. श्रीमंत पाटील : स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त ऐनापुरला रोपवाटप अथणी (प्रतिनिधी) : पर्यावरण व निसर्गसौंदर्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे निसर्गाचे सौंदर्य करायचे असेल तर प्रत्येकाने एक तरी रोपटे लावले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने ऐनापुर येथे यापूर्वीच ट्री …

Read More »

कोगनोळी येथे पावसामुळे घरांची पडझड

कोगनोळी : सलग आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून या घरांचा सर्व्हे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. येथील अर्चना उत्तम कागले, आप्पासाहेब लगम्माना भोजे, सागर शिवाजी पंढरे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची घरे या पावसामध्ये पडले आहेत. यामुळे अनेकांचे …

Read More »

मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ पदवीने डाॅ. ऋचा चिकोडे सन्मानित

सीमाभागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी ही राखीव जागा ठेवणेची सीमावासीयाची मागणी निपाणी : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी घेतलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सीमाभागातील निपाणी नगरीची सुकन्या डॉ. ऋचा राजन चिकोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन M.S. (Obst and Gynae) मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ ही पदवी …

Read More »

भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व

  मुंबई : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलेय. तसेच भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी …

Read More »

“त्या” 22 शाळांना उद्या पुन्हा सुट्टी

बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शुक्रवारी दि. 12 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शुक्रवारी (१२ ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात आली …

Read More »

उत्तर प्रदेशात बोट उलटून 30 जण बुडाले; चौघांचे मृतदेह सापडले

उत्तर प्रदेशमधील बांदा येथे गुरुवारी दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी एक बोट बुडाली. बोटीत 30 हून अधिक लोक होते. यातील चार जण कसेतरी पोहत नदी काठी पोहचले. पोलीस प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. एसडीआरएफचेही पथक बुडालेल्या लोकांचा …

Read More »

टीएमसीच्या आणखी एका नेत्यावर घोटाळ्याचे आरोप, सीबीआयने केली अटक

  कोलकात्ता : प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी न्यायालयात टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना आज आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. सीबीआयने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी दिली आहे. टीएमसी नेत्याला प्राण्यांच्या तस्करीच्या एका प्रकरणात अटक …

Read More »