Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

निपाणीच्या एकाकडून दीड लाखाच्या गुटख्यासह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

कागल पोलिसांची कारवाई : रत्नागिरीचा आरोपीही ताब्यात निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीला बंदी आहे. तरीही निपाणी सीमाभागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन कागल पोलीसांकडून पान मसाला व सुगंधी तंबाखु गुटखा विक्री करणेसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख …

Read More »

सौंदलगा येथील हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हायस्कूलमध्ये बैठकीचे आयोजन

  सौंदलगा : सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. 21 /6 /1973 रोजी या हायस्कूलची स्थापना सौंदलगा येथे करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल असून या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाचे एक केंद्रबिंदू म्हणून या हायस्कूलकडे पाहिले जाते. या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 21/6/2022 …

Read More »

विभागीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे उल्लेखनीय यश

खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी येथे झालेल्या गुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सांघिक खेळामध्ये मुलांच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक, मुलींच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तर रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. वैयक्तिक खेळामध्ये गुरुप्रसाद संजय गावकर उंच उडीमध्ये प्रथम, वरूणा …

Read More »

अंगणवाडी कर्मचारी, सहायक पदाकरिता अर्जाचे आवाहन

  खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात चार अंगणवाडी शिक्षिका व अकरा मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी18 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांनी अर्ज करावा असे महिला आणि बाल कल्याण खात्याकडून सांगण्यात आले आहे. बांदेकरवाडा, शिंपेवाडी, मुडेवाडी व ओलमनी या गावातील केंद्रामध्ये शिक्षिका तर हाळझुंजावड (नांजिंकोंडल) मुगलिहाळ, हत्तरवाड, …

Read More »

मराठा समाज विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा : मनोहर कडोलकर

  बेळगाव : कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरातील मराठा समाजातील बेरोजगार आणि विद्यार्थ्यांसाठी श्री शहाजीराजे समृद्धी योजना तसेच स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजने अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील मराठा समाजातील लाभार्थ्यांनी सदर योजनेचा …

Read More »

तोपिनकट्टीत माऊलीदेवीची यात्रा १९ ते २३ ऑगस्टपर्यंत

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे तीन वर्षांनी एकदा होणारी श्रीमाऊली देवीची यात्रा शुक्रवारी दि. १९ ते मंगळवारी दि. २३ ऑगस्टपर्यंत असे पाच दिवस होणार आहे, असा निर्णय तोपिनकट्टी पंच कमिटीच्या बैठकीत शुक्रवारी दि. ५ रोजी घेण्यात आला. यावेळी बैठकीला माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नारायण शंकर गुरव, उपाध्यक्ष मारूती …

Read More »

प्रबुद्ध भारततर्फे 7 रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम

  बेळगाव : प्रबुद्ध भारत बेळगावतर्फे रविवार दि. 7 रोजी रात्री 8.30 वाजता भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. टिळक चौक येथे होणार्‍या या कार्यक्रमात भारतमातेचे पूजन, निवृत्त जवान सिद्धाप्पा चांगू उंदरे, कारगिल युद्धातील हुतात्मा भरत मस्के यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी भरत मस्के यांचा सत्कार होणार आहे. पूज्य …

Read More »

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज

  मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत. त्याचवेळी विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी …

Read More »

अवरोळी श्री रुद्रास्वामी मठात आज भारतमाता पुतळ्याचे अनावरण

खानापूर (विनायक कुंभार) : अवरोळी येथील मठात 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचा 85 इंचाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. नकाशाच्या मध्यभागी 75 इंच उंचीचा भारतमातेचा पुतळाही तयार करण्यात आला आहे. हि मूर्ती देशप्रेमीसाठी एक पर्वणी ठरणार आहे. सकाळी 9 वाजता या मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडणार आहे, असे मठाचे चनबसव …

Read More »

साक्षी, दीपकची सुवर्ण; तर अंशूची रौप्यकमाई

  बर्मिंघम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साक्षी भारताची एक अनुभवी कुस्तीपटू असल्याने ती कॉमनवेल्थमध्ये सुरुवातीपासून दमदार …

Read More »